नाशिक : टपाल विभागाच्या पेन्शन/परिवान पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींसाठी प्रवर अधिक्षक डाक घर नाशिक विभाग, नाशिक यांच्याद्वारे शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता जीपीओ कंपाऊंड, नाशिक येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पेन्शन/परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी आपले अर्ज विहित नमुन्यात प्रवर अधिक्षक डाक घर नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्त्यावर 25 जुलै 2019 पर्यंत मिळतील अशा रितीने पाठवावेत. कायदेशीर बाबी, धोरणात्मक निर्णय (पॉलिसी) बद्दलच्या तक्रारी अदालत मध्ये विचारात घेतल्या जाणार नाहीत. पेन्शन/परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी नजिकच्या पोस्ट कार्यालयातुन अर्जाचा नमुना प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन, प्रवर अधिक्षक डाक घर नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





