६ इन १ लस– लहान बाळे आणि पालकांसाठी मोठा दिलासा : डॉ. शर्मिला कुलकर्णी

Jun 7, 2022

महाराष्ट्रातील लसीकरण ७३.५ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढायला हवे, शहरी भागांवर अधिक भर देण्याची गरज

नाशिक: मुलांना असंख्य प्रकारच्या जंतूंमुळे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. मुलांची रोगप्रतिकारशक्ती विकसनशील अवस्थेत असते आणि सर्व प्रकारच्या गंभीर आजारांशी लढा देणं त्यांना शक्य नसतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासारख्या आजारांमुळे होणारे सर्व वयोगटातील मृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण हा एक सर्वाधिक यशस्वी असा सार्वजनिक आरोग्याचा मार्ग आहे.६ इन १ लसीकरणामुळे ६ गंभीर आजारांपासून मुलांचे संरक्षण होते : घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात,  हिमोफिलिस इन्फ्लुएंजा टाईप बी, हेपेटायटिस बी आणि पोलिओ.

याबद्दल नाशिकच्या संजीवन हॉस्पिटलच्या संचालक, कन्सलटंट पीडि अॅट्रिशन आणि नीओनॅटोलॉजीस्ट डॉ. शर्मिला कुलकर्णी म्हणाल्या, “अधिक इंजेक्शन घ्यावे लागत नाहीत आणि डॉक्टरांच्या क्लिनिकलाही कमी वेळा जावं लागतं. त्यामुळे कॉम्बिनेशन वॅक्सिनेशन अधिक फायद्याचं ठरतं. मुलांप्रमाणेच पालकांसाठीसुद्धा ही फार सोयीची बाब आह. पालक कॉम्बिनेशन वॅक्सिनेशनला अधिक पसंती देतात कारण त्यामुळे मुलांना कमी वेळा त्रास आणि दुखणं सहन करावं लागतं. कारण, यात एकाच इंजेक्शनमध्ये विविध आजारांसंदर्भात संरक्षण मिळतं.”

इंडियन अकॅडमी ऑफ पिडिअॅट्रिक्सच्या लसीकरण वेळापत्रकानुसार, DTP-IPV-Hib-HepB ही लस मुलांना ६, १० आणि १४ व्या आठवड्यात द्यायची असते. ६ इन १ लस या सहा आजारांपासून संरक्षण देते. ६ इन १ लस म्हणजे यातील प्रत्येक वेळेला मुलांना फक्त दोन इंजेक्शन्स दिली जातील (एक ६ इन १ आणि न्युमोकोकल लस) आणि एक तोंडावाटे देण्याची लस (रोटावायरस लस). अशी एकत्रित लस नसल्यास मुलांना अधिक इंजेक्शन्स घ्यावी लागतील.

गेल्या काही वर्षात, देशातील लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारताने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लक्षणीय प्रमाणात झालेले बदल नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे- NFHS-5 मध्ये दिसून आले. १२ ते २३ महिने या वयोगटातील पूर्ण लसीकरण झालेल्या मुलांची टक्केवारी* भारतात ६२ टक्क्यांवरून (NFHS-4; २०१५-१६) ७६.४ टक्क्यांवर (NFHS-5; २०१९-२१) आणि महाराष्ट्रात ५६.२ टक्क्यांवरून ७३.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातही  ग्रामीण भागात लसीकरण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, शहरी भागांमधील ही वाढ फारच मर्यादित आहे.

लसीकरणाचे फायदे आणि लशींची उपलब्धता यासंदर्भात पालकांमध्ये  जागरुकता आणण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. त्यामुळे पूर्ण लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के आणि त्यापुढे जाऊ शकेल. अशा एकत्रित लसींमुळे मुलांना कमी डोस घ्यावे लागतील मात्र वेगवेगळ्या लसींमधून त्यांना जे संरक्षण मिळते तेवढेच संरक्षण मिळेल.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News