भारतीय ब्रीज संघाच्या शिबिराचे आयोजन

Jun 8, 2022

मित्र विहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि नाशिक ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने भारतीय ज्यूनियर गटांच्या खेळाडूंसाठी नाशिक येथील केन्सिंग्टन स्पोर्ट्स क्लब येथे पाच दिवसीय ब्रीज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन नाशिकच्या सर्वात जुनी असलेल्या मित्र विहार क्रीडा संस्थेचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाचे संहसचिव आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव तथा या शिबिराचे संयोजन प्रमुख हेमंत पांडे, नाशिक ब्रीज असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. अतुल दशपुत्रे, शेट्टी, तसेच जागतिक स्पर्धेत रौप्य पदक विजेते अनिल पाध्ये, अनिरूद्ध सांझगिरी, विनय देसाई, एस.के. आयंगार, गिरीश बिजुर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल पाध्ये आणि हेमंत पांडे यांनी प्रमुख पाहुणे विनोद कपूर यांचे पुष्प गुछ देऊन स्वागत केले. यावेळी विनोद कपूर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की नाशिकमध्ये १९११ साली मित्र विहार क्लबमध्ये खास ब्रीज हा खेळ खेळण्यासाठी हा क्लब सुरु करण्यात आला होता. ही सुविधा आज १०० वर्षानंतरही अविरतपणे सुरू आहे. येथे ब्रीजसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. असे सांगून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूनी ब्रीजच्या माध्यमातून आपल्या देशाचे नांव जगभरात उंचवावे असे आवाहन केले. भारताच्या विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या शिबिरात १६ वर्षे मुले आणि मुली, १८ वर्षे मुले आणि मुली, २१ वर्षे मुले आणि मुली आणि ३१ वर्षे मुले आणि मुली अश्या चार वयोगटांचा समावेश आहे. या शिबिरासाठी पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजराथ, बिहार, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अश्या विविध राज्यातील २४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

दिनांक ७ ते १४ ऑगस्ट, २०२२ दरंयान इटली येथे ज्यूनीयर गटाच्या वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या खेळाडूंची चांगल्या प्रकारे तयारी व्हावी यासाठी ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये खेळाडूंना जागतिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलेले अनिल पाध्ये तसेच जेष्ठ प्रशिक्षक अनिरुद्ध सांझगिरी, विनय देसाई, एस. के. आयंगार, गिरीश बिजुर आदींकडून मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती या शिबिराचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News