नाशिक:- उत्साही सायकलस्वारांना एकत्र आणणे, समाजाच्या एकत्रीकरणाला हातभार लावणे आणि सायकलपटुंना सर्वसमावेशक ब्रँडचा अनुभव देण्याच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी नाशिकमध्ये अमेरिकेची ट्रेक बायसिकल कंपनी आणि नाशिकमधील सायकलचे डीलर लुथरा एजन्सी यांनी संयुक्तपणे उद्या दिनांक २१ जुलै रोजी नाशिकमध्ये ” ट्रेक फाउंडर्स राइड ” चे आयोजन केले आहे. या ” ट्रेक फाउंडर्स राइड ” आणि अमेरिकेच्या ट्रेक बायसीकलबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आज दिनांक २० जुलै रोजी पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक हे महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांपैकी एक असून नाशिकमध्ये सायकलिंगचे चांगले वातावरण आहे. नाशिकमध्ये जास्तीत जास्त सायकलपटू तयार व्हावे आणि नाशिकच्या सर्व नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने नाशिकमध्ये या ” ट्रेक फाउंडर्स राइड “ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये १०० सायकलस्वारांनी आपला सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे. या राईडमध्ये हे सर्व सायकलस्वार २५ किलोमीटर सायकलिंग करणार आहेत. या राईडची सुरवात जुना गंगापूर नाका सिग्नल येथून होणार असून त्यानंतर जहान सर्कल, महात्मा नगर, ए. बी. बी. सर्कल, त्रिंबक रोड मार्गे संदीप फौंडेशन आणि शेवट ग्रेप काउंटी रिसॉर्ट असा या राईडचा मार्ग असणार आहे. या राईडमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा असणार नाही तर जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्र सायकल चालवून याचा आनंद घाव्या आणि सायकलपासून होणारे फायदे याचा लाभ घ्यावा यासाठी हे १०० सायकलस्वार २५ किलोमीटर सायकलिंग करत आनंद घेणार आहेत. याद्वारे सायकलस्वारांची आपापसात ओळख व्हावी आणि सायकलिंगद्वारे होणारे फायदे एकमेकांना समजावे हा यामागील हेतू आहे. यादरम्यान सहभागी सायकलपटूना तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ही सायकल राईड सगळ्यांसाठी एक चांगले व्यासपीठच ठरणार आहे. या उपक्रमासाठी ट्रेक बायसिकलचे भारताचे गुडगांव येथील मुख्य मॅनेजर नवनीत बंकाहे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या राईडच्या माध्यमातून सायकलपटुंना कसा फायदा होणार आहे याची माहिती नवनीत बंका आणि नाशिकच्या लुथरा एजन्सीचे संचालक राज लुथरा यांनी दिली. नवनीत बंका यांनी सांगितले की सायकल तयार करणारे अनेक उत्पादक आहेत परंतु ट्रेक बायसिकल कंपनीने सायकलेचा वापर करतांना काय काय अडचणी येतात याचा अगदी सखोल विचार करून आपल्या या ट्रेक बायसिकलची निर्मिती केली आहे. सायकलचे वजन, त्याचे वेगवेगळे पार्टस याचा योग्य वापर करून याची निर्मिती केली जाते असे सांगितले. तर राज लुथरा यांनी सांगितले की नाशिकचे हवामान चांगले असल्यामुळे उत्साही सायकलस्वार वर्षभर सायकलचा आनंद घेतात. गेल्या काही वर्षांत एक चांगला क्रीडा प्रकार म्हणून आणि आनंदासाठी नाशिकमध्ये सायकलिंग करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायकलला कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नसल्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी पूरक प्रयत्न आणि स्वत:चे आरोग्य राखण्यासाठीचा व्यायाम प्रकार म्हणून लोकांनी सायकलिंगची सवय लावून घ्यायला सुरुवात केली आहे. या उत्साही सायकलस्वारांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण व्हावा, ट्रेक कंपनीच्या विविध ब्रँडच्यादर्जेदार उत्पादनांचा आगळावेगळा अनुभव आणि सर्व सुविधा नाशिकच्या ग्राहकांना देण्याचा आमचा मानस आहे त्यासाठीच आम्ही ट्रेक कुटुंबाचा भाग झालो आहोत याचा आम्हाला आनंद आहे असे असे राज लुथरा यांनी सांगितले.
ट्रेक बायसिकल विषयी – गेल्या चार दशकांत संशोधनाला चालना देण्याची परंपरा राखणा-या ट्रेक कंपनीचा तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वांत अद्ययावत सायकल उत्पादक कंपनी असा जगभर नावलौकिक आहे. १९९०मध्ये सर्वांत पहिल्यांदा कार्बन सायकलचे उत्पादन करणाऱ्या ट्रेक कंपनीने, अजूनही व्यवसायातील आघाडीचे स्थान राखले आहे आपला दर्जा टिकविण्यासाठी चांगल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकेला जातो. त्यासाठी व्यावसायिक सायकलस्वारांकडून ट्रेक कंपनी आपल्या सायकलींसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची आणि सायकलींच्या कार्यक्षमतेची तपासणी करून घेतली जाते. तसेच आपल्या सायकलींचे सुटे भाग, ऍक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रायडिंग गिअरची मोठी श्रेणीही ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक नव्या ट्रेक सायकलसोबत ग्राहकाला उद्योगातील सर्वोत्तम वॉरंटी आणि लॉयलिटी प्रोग्रॅम दिला जातो, ज्यामध्ये सायकलच्या फ्रेमची आजीवन वॉरंटीचा समावेश आहे.
खरेदीसाठी सुविधा :- ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सायकल खरेदीमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी ट्रेक कंपनीने एचडीएफसी बँकेशी भागीदारी केली असून त्याअंतर्गत भारतातील कंपनीच्या अधिकृत रिटेल दालनातून ट्रेक उत्पादनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच ही सवलत मिळणार आहे.
जगभरातील १०० देशांत रिटेल दालनांत कंपनीच्या सायकल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
भारतातील कार्याविषयी :- ट्रेकचे सध्या भारतात २७,००० हून अधिक ग्राहक आहेत आणि २०१८ मध्येच कंपनीने भारतात उपकंपन्या सुरू केल्या आहेत. जगभरातील तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वांत अद्ययावत बायसायकलिंग कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या ट्रेकच्या वतीने आतापर्यंत रस्ते आणि पर्वत अशा दोन्ही प्रकारांत ४० हून अधिक मॉडेल्स सादर केली आहेत. तसेच ट्रेक आणि बॉनट्रॅजर या ब्रँडच्या माध्यमातून सुटे भाग, अॅक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रिडिंग गिअरचीही मोठी श्रेणी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. ट्रेक आणि बॉनट्रॅजर उत्पादने देशातील ३२ शहरांतील ३४ दालनांमध्ये उपलब्ध असून या शहरांच्या यादीत दिल्ली, हैदराबाद, मुंबई, नाशिक, लुधियाना, गाझियाबाद, चेन्नई, बेंगळुरू, इंदूर, हल्दवानी, विशाखापट्टणम, मंगळूर, गोवा, नागपूर, पटियाला, ठाणे, पुणे, अहमदाबाद, जालंधर, रायपूर, श्रीनगर, कोल्हापूर, कोलकाता, भोपाळ, विजयवाडा, सिलिगुडी, लखनौ, भुवनेश्वर, म्हैसूर, जयपूर, देहराडून, नांदेड या शहरांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या – https://www.trekbikes.com






