महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा सई नंदुरकरला विजेतेपद. नाशिककरांना सईकडून अश्याच चांगल्या कामगिरीची अपेक्षा – मकरंद देव, बॅडमिंटन प्रशिक्षक

Jul 21, 2019

पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत वितेजेपदाचा चषक स्वीकारतांना साई नांदुरकर आणि  सिद्धी जाधव.

नाशिक   :- पुणे येथे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात नाशिकच्या सई नंदुरकरने सिद्धी जाधवच्या जोडीने खेळतांना अंतिम लढतीत रमशा फारुकी आणि सनश्री ढमढेरे याचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे  दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सई आणि  सिद्धी या जोडीने  उपउपांत्यपूर्व लढतीत इशा सोनसळे आणि मधुरा पटवर्धन यांचा २१-१६ , २१- १६ अश्या सरळ दोन सेटमध्ये . तर उपांत्यपूर्व फेरीत भार्गवी रंभाड  आणि चैताली  नायसे याचा २१-१० आणि २१-१६ असा पराभव करून उपांत्य अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत या जोडीने ऋचा सावंत आणि रिया हब्बू यांचा २१-१०, २१-१७ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सई आणि  सिद्धी यांची अंतिम लढत रमशा फारुकी आणि सनश्री ढमढेरे यांच्याशी झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम लढतीत सई आणि सिद्धी यांनी चांगली सुरवात करून पहिला सेट २१- १४ असा जिंकून आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी हा दुसरा सेटही २१-१७ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत  एकेरीमध्ये खेळतांनाही सईने नंदुरकरने चांगले प्रदर्शन केले.  परंतु उपांत्यपुर्व फेरीत तिला तनिष्का देशपांडेंकडून पराभव पत्करावा लागला. सई नांदुरकरने  याआधीही  मिनी, सब ज्युनियर आणि ज्युनियर स्पर्धामध्ये राज्याचे विजेतेपद पटकावले आहे. आणि  महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतांना राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करून पदकांची कमाई केली आहे.  सई  गेल्या १०  वर्षांपासून शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचा नियमित सराव करत आहे. सई नंदुरकरने याआधी एकेरीमध्ये खेळतांना चांगली कामगिरी करून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविली आहेत,  तर दुहेरीमध्ये  तीने प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. सईचा प्रगतीचा आलेख बघता तिच्याकडून नाशिककरांना यापेक्षाही आणखी मोठया कामगिरीची अपेक्षा आहे असे सईचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी यावेळी सांगितले.     
 सईच्या या यशाबद्दल शिवसत्य क्रीडा मंडळाच्या हिमगौरी आहेर, अनंत जोशी, राधेश्याम मुंदडा, योगेश एकबोटे,  नरेंद्र छाजेड, आंनंद खरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News