खेळाडूंनी जिद्दीने खेळून देशाचा नावलौकिक उंचवावा. – अशोक कुमार ध्यानचंद सिंग

Jun 24, 2022

२३ जून, ऑलिम्पिक दिनानिमित्त रिव्हरसाईड गोल्फ कोर्सेला ऑलिंपियन अशोक कुमार यांची भेट 

नाशिक : – २३ जून हा दिवस जगभरात ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने नाशिकच्या निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सेच्या वतीने भारताचे ऑलिंपियन पदक विजेते खेळाडू आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार , जिल्हा गोल्फ असोसिएशनचे सचिव नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते ऑलिंपियन अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांना सन्मानित करण्यात आले. अधिक कुमार यांनी १९७२ च्या ऑलिम्पिक मध्ये ब्राँझ पदक तर १९७५ च्या विश्व हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून भारताला सुकवर्णपदक, एशियाड मध्ये तीन सुवर्णपदके मिळवून दिले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
याचं निमित्ताने अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांच्या हस्ते रिव्हरसाईड गोल्फ कोर्से येथे उभारण्यात येणाऱ्या क्लब हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना अशोक कुमार यांनी सांगितले की खेळाडूंनी आपल्यामध्ये जिद्द निर्माण करावी आणि त्याप्रमाणे मेहनत घेऊन आपल्या देशाचे नांव जगभरात पोचवावे असे सांगितले.


यावेळी संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी सांगितले की, सर्वांच्या सहकार्यातून उभा राहिलेल्या या रिव्हरसाईड गोल्फ कोर्सचा लाभ समाजातील सर्व खेळाडूंनी घ्यावा असे अवाहन केले.
या कार्यक्रमासाठी अशोक दुधारे, राजीव देशपांडे, नितीन हिंगमिरे, आनंद खरे, सौ शीतल बागमार.प्रफुल्ल बागमार. जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्तित होते.
यावेळी तयार होणाऱ्या या क्लब हाऊसची सभासद नोंदणी सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ नाशिकच्या गोल्फ प्रेमींनी आणि खेळाडूंनी घ्यावा अशी माहिती प्रदीप बागमार यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले तर नितीन हिंगमिरे यांनी प्रमुख पाहुणे अशोक कुमार आणि सर्व उपस्तीतांचे आभार व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News