ऑलिंपियन अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांच्या हस्ते राज्य स्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरण

Jun 27, 2022

शिक्षक हा खेळाडूंच्या वाटचालीतील महत्वाचा घटक – अशोक कुमार ध्यानचंद सिंग

नाशिक :- २३ जून हा दिवस जगभरात ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच क्रीडा संस्कृती आणि कालिका देवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून २३ ते ३० जून हा आठवडा ऑलीम्पिक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहांतर्गत राज्य स्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भारताचे हॉकीचे ऑलिम्पिक पदक विजेते,विश्व चषकचे सुवर्णपदक विजेते खेळाडू आणि मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या ५० कार्यक्षम क्रीडा शिक्षकांचा आकर्षक चषक, सन्मानपत्र, शाल श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, डॉ. पांडुरंग रणमाळ, नितीन हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना ऑलिंपियन अशोक कुमार यांनी सांगितले की प्रत्येक खेळाडूंच्या खेळातील वाटचालीत त्यांच्या क्रीडा शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूला दिशा मिळते. आणि खेळाडू आपल्या खेळामध्ये प्रगती करू शकतात. त्यामुळं अश्या क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक यांचा सन्मान करणे हा उपक्रम स्तुत्य आहे असे सांगून सर्व पूरस्कारार्थीचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले अशोक दुधारे यांनी अशोक कुमार यांच्या खेळातील योगदानाची माहिती दिली तर सूत्रसंचालन उदय खरे यांनी केले.
या पूरस्कारार्थीमध्ये श्रीमती सुनीता निकम, अनिता पवार, राजश्री केदार, वैशाली नेमाडे, श्री महादेव क्षीरसागर, प्रताप गीते, बन्सीलाल महाजन, सुधीर वराडकर, आनंद किनगो, दिलीप पावरा, जितेन्द्र सोनावणे, माणिकलाल शिंपी, शरद बोरसे, किरण वाईकर, बापू शिंपी, सर्जेराव शिंदे,किरण मोगरकर, गणेश विश्वकर्मा, प्रल्हाद राऊत, सचिन कोकोडे, किशोर ताकसांडे, संतोष वाळुंजकर, विरेंद्र गायकवाड, सुहास कांबळे, सुनील शर्मा, धनंजय देवकर, मकरंद कोल्हारकर, भाऊसाहेब शिंदे, प्रवीण घोगरे, राजेंद्र तिवारी, पुरुषोत्तम देशमुख, दिलीप चव्हाण, संजय मुंडे, नागेश्वर कान्हेकर , दीपक माने, रामेश्वर कोरडे, माणिक कदम, जनार्दन नंन्नावारे, डॉ. भूषण भाटे, संदीप पाटील, रोशेल डिसुझा, जितेन्द्र जाधव, किशोर पाटील, श्रीमती हेमलता पाटील, विजय सोमकुंवर, संजय उराडे, सांगपाल नारनवरे, डॉ. बबलू श्रीगिरीवर, डॉ. यशवंत पाटील, श्रीमती पुष्पा कापडणे यांचा समावेश होता.
यावेळी काही पुरस्कारर्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या परीने क्रीडा क्षेत्रात काम करत आहोत. परंतु अशोक कुमार यांच्यासारख्या ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळविणाऱ्या महान खेळाडूच्या हस्ते आमचा गौरव केला जात आहे याचा आम्हाला जास्त अभिमान आहे असे सांगितले. नितीन हिंगमिरे यांनी आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News