१२० सायकलस्वारांनी नोंदवला आपला सहभाग
नाशिक :- अमेरिकेची ट्रेक बायसिकल कंपनी आणि नाशिकचे सायकलचे डीलर लुथरा एजन्सी यांनी संयुक्तपणे आज रविवार दिनांक २१ जुलै रोजी ” ट्रेक फाउंडर्स राइड ” चे आयोजन करण्यात आले होते. या राईडची यशस्वी सांगता झाली. यामध्ये १२० सायकलस्वारांनी आपला सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे. या राईडची सुरुवात जुना गंगापूर नाका सिग्नल येथून करण्यात आली. त्यानंतर जहान सर्कल, महात्मा नगर, ए. बी. बी. सर्कल, त्रिंबक रोड मार्गे संदीप फौंडेशन आणि शेवट ग्रेप काउंटी रिसॉर्ट असा राईडचा मार्ग होता. या राईडमध्ये या सर्व सायकलस्वारानी या मार्गावरून २५ किलोमीटर सायकलिंग केले. यामध्ये सायकल या प्रकारात विविध उपक्रम आणि रेकॉर्ड केलेले डॉ. महिंद्र महाजन, मेजर कुलकर्णी, जयंत कंसारा, राम , सौ. मनीषा रौंदळ यांच्यासह नाशिकच्या सर्व सायकल स्वारांनी सहभाग घेऊन नाशिककरांच्या सायकल चळवळळीचा प्रत्यय दिला.
यावेळी राज लुथरा यांनी सांगितले की सायकलचे हब म्हणून नाशिकचे नांव पुढे आले आहे. नाशिकमध्ये सायकलिंगचे चांगले वातावरण आहे. जिल्हयात जास्तीत जास्त सायकलपटू तयार व्हावे आणि नाशिकच्या सर्व नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने या ” ट्रेक फाउंडर्स राइड ” या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही सायकल चळवळ अशीच पुढे जावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही दर महिन्यांच्या पहिल्या रविवारी अश्या राईडचे आयोजन करत असतो. तसेच महिलांमध्येही सायकलची आवड निर्माण व्हावी यासाठी महिलांसाठी दर महिन्याला आम्ही असे उपक्रम करत आहोत याचाच याक भाग म्हणून आजच्या या ” ट्रेक फाउंडर्स राइड ” चे आयोजन केले आहे असे सांगितले.
या ” ट्रेक फाउंडर्स राइड ” आणि अमेरिकेच्या ट्रेक बायसीकलबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आज दिनांक २० जुलै रोजी पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेची ट्रेक बायसिकल कंपनीचे भारतातील गुडगांव येथिल प्रमुख नवनीत बंका यांनी सांगितले की
उत्साही सायकलस्वारांना एकत्र आणणे, समाजाच्या एकत्रीकरणाला हातभार लावणे आणि जास्तीत जास्त जनतेने सायकलचा अवलंब करून स्वतःचे आरोग्य आणि वातावरणातील समतोल राखणे हे या राईडचा प्रमुख उद्देश आहे असे सांगितले.
या २५ किलोमीटर ट्रेक फाउंडर्स राइड संपल्यानंतर सर्व सहभागी सायकल पटुंना आणि इतर नागरिकांना सायकल विषयी सखोल माहिती व्हावी यासाठी ग्रेप काउंटी रिसॉर्ट ट्रेक बायसिकल ब्रॅण्डबद्दलमाहिती देण्यात आली. यामध्ये ट्रेक सायकलचे एकूण फायदे, तसेच सायकल चालवतांना काय सुघेणे आवश्यक आहे, उदा. हेल्मेट वापरणे, सायकलला दिवसा आणि रात्रीही पुढचे लाईट आणि मागचे लाईट असावे यासाठी ट्रेक कंपनीने दोन किलोमीटरपर्यंत दिसतील अशी व्यवस्था केली आहे असे सांगितले. तसेच सायकलचा वापर करतांना तीची काळजी घेणे, उदा. वेळोवेळी साफसफाई करणे, ऑलिइंग करणे हे कसे आणि कधी करावे याचे मार्गदर्शन केले. तसेच सायकल मध्ये असलेल्या गेअर्सचा कसा आणि कुठे उपयोग होतो आणि तो कसा करून घ्यावा याचीही माहिते देण्यात आली.
या उपक्रमाद्वारे नाशिकच्या जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा अवलंब करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठीं मदत करावी असे आवहान यावेळी नवनीत बंका आणि राज लुथरा यांनी केले.
ट्रेक बायसिकल विषयी – गेल्या चार दशकांत संशोधनाला चालना देण्याची परंपरा राखणा-या ट्रेक कंपनीचा तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वांत अद्ययावत सायकल उत्पादक कंपनी असा जगभर नावलौकिक आहे. १९९०मध्ये सर्वांत पहिल्यांदा कार्बन सायकलचे उत्पादन करणाऱ्या ट्रेक कंपनीने, अजूनही व्यवसायातील आघाडीचे स्थान राखले आहे आपला दर्जा टिकविण्यासाठी चांगल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकेला जातो. त्यासाठी व्यावसायिक सायकलस्वारांकडून ट्रेक कंपनी आपल्या सायकलींसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची आणि सायकलींच्या कार्यक्षमतेची तपासणी करून घेतली जाते. तसेच आपल्या सायकलींचे सुटे भाग, ऍक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रायडिंग गिअरची मोठी श्रेणीही ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक नव्या ट्रेक सायकलसोबत ग्राहकाला उद्योगातील सर्वोत्तम वॉरंटी आणि लॉयलिटी प्रोग्रॅम दिला जातो, ज्यामध्ये सायकलच्या फ्रेमची आजीवन वॉरंटीचा समावेश आहे.
खरेदीसाठी सुविधा :- ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सायकल खरेदीमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी ट्रेक कंपनीने एचडीएफसी बँकेशी भागीदारी केली असून त्याअंतर्गत भारतातील कंपनीच्या अधिकृत रिटेल दालनातून ट्रेक उत्पादनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच ही सवलत मिळणार आहे.
जगभरातील १०० देशांत रिटेल दालनांत कंपनीच्या सायकल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
भारतातील कार्याविषयी :- ट्रेकचे सध्या भारतात २७,००० हून अधिक ग्राहक आहेत आणि २०१८ मध्येच कंपनीने भारतात उपकंपन्या सुरू केल्या आहेत. जगभरातील तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वांत अद्ययावत बायसायकलिंग कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या ट्रेकच्या वतीने आतापर्यंत रस्ते आणि पर्वत अशा दोन्ही प्रकारांत ४० हून अधिक मॉडेल्स सादर केली आहेत. तसेच ट्रेक आणि बॉनट्रॅजर या ब्रँडच्या माध्यमातून सुटे भाग, अॅक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रिडिंग गिअरचीही मोठी श्रेणी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. ट्रेक आणि बॉनट्रॅजर उत्पादने देशातील ३२ शहरांतील ३४ दालनांमध्ये उपलब्ध असून या शहरांच्या यादीत दिल्ली, हैदराबाद, मुंबई, नाशिक, लुधियाना, गाझियाबाद, चेन्नई, बेंगळुरू, इंदूर, हल्दवानी, विशाखापट्टणम, मंगळूर, गोवा, नागपूर, पटियाला, ठाणे, पुणे, अहमदाबाद, जालंधर, रायपूर, श्रीनगर, कोल्हापूर, कोलकाता, भोपाळ, विजयवाडा, सिलिगुडी, लखनौ, भुवनेश्वर, म्हैसूर, जयपूर, देहराडून, नांदेड या शहरांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या – https://www.trekbikes.com






