उत्कर्ष, ओम, प्राची, अनुष्का यांना विजेतेपद
नाशिक : ऑलिम्पिक सप्ताह अंतर्गत नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन आणि क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कालिका देवी मंदिर संस्थान, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता दर्शन महिला मंडळ यांच्या सहकार्याने उपकनिष्ट (१७ वर्षे ) आणि कनिष्ठ गटाच्या ( १९ वर्षे) जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत उपकनिष्ट गटामध्ये उत्कर्ष परदेशीने अंतिम लढतीत यश अहिरेचा २१-१६ आणि २१-१३ असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
तर कनिष्ठ गटामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत ओम विभांडीकने शेवटच्या क्षणी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून निरज कुऱ्हाडेला केवळ दोन गुणांनी पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळविले.
१७ वर्षे मुलींमध्ये प्राची मनवरने तर १९ वर्षे गटात आनुष्का विसपुते विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत मुलांमध्ये ६१ तर मुलींमध्ये १९ खेळाडूंनी सहभाग घेतला.
विजेत्या खेळाडूंना छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे, राम पाटील, दिपक निकम यांच्या हस्ते मेडल्स आणि प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी उमेश सेनभक्त, प्रशांत गायकवाड, चेतन काळे यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेचा निकाल –
१७ वर्षे मुले – १) उत्कर्ष परदेशी – प्रथम,
२) यश अहिरे – द्वितीय
३) श्रीराज अहिरे. आणि यश कुमावत – संयुक्त तृतीय
१९ वर्षे मुले –
१) ओम विभांडीक – प्रथम
२) निरज कुऱ्हाडे – द्वितीय
३) नकुल चावरे आणि भूषण भरते – संयुक्त तृतीय
१७ वर्षे मुली –
१) प्राची मनवर – प्रथम,
२) नयना आव्हाड – द्वितीय
३) कर्तिका अहिरे आणि पायल चव्हाण -संयुक्त तृतीय
१९ वर्षे मुली-
१) अनुष्का विसपुते – प्रथम
२) श्रुती गोडसे – द्वितीय
३) नेहा मनवर आणि स्नेहा कुमावत – संयुक्त तृतीय






