पेन फिजिशयन शास्त्राबाबत ISSP चे महत्वाचे योगदान : डॉ.विशाल गुंजाळ

Jul 9, 2022

नाशिकच्या SMBT हॉस्पिटल मध्ये फेलोशिप कोर्सेस उपलब्ध

नाशिक : Indian Society For the Study Of Pain (ISSP) चा ९ जुलै २०२२ हा स्थापना दिवस मानला जातो . ISSP ही भारतातील पेन फिजिशियन अथवा वेदनानिवारण या विषयात पारंगत असणार्‍या तज्ञांची संघटना आहे. अगदी मूठभर असलेल्या लोकांनी १९८४ साली चालू झालेल्या या संघटनेने आता बराच मोठा विस्तार केलाय अणि आता त्याचा वटवृक्ष वाढत चालला आहे. फार पूर्वी ह्या विषयात भारतात कोणतेही फेलोशिप कोर्सेस उपलब्ध नव्हते, मात्रं जिद्दीने पेटलेल्या जुन्या-जाणत्या डॉक्टरांनी या विषयात उपलब्ध असलेली पुस्तके वाचून तसेच काहींनी परदेशात जाऊन, तिथे शिकून परत भारतात येऊन ज्ञानदानाचे कार्य चालू केले अणि आता हा यज्ञ अखंडपणे चालू ठेवण्याचे कार्य ही संघटना करत असल्याची माहीती नाशिक पेन केअर सेंटरचे प्रसिध्द पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली

Pain – दर्द, वेदना ….अगदी उत्क्रांती पासून मानवाच्या पाचवीलाच पुजलेली आहे, म्हणजे बाळ जन्माला येते ते देखील आईला गर्भारपणात वेदना देऊनच ! अणि बर्‌याचदा मृत्यूदेखील हा वेदनादायी असतो. अणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर विविध वेदनांना मानवाला सामोरे जावेच लागते, मग त्या शारीरिक असोत वा मानसिक….पण हा मानव पडला हट्टी प्राणी! संघर्ष , समस्येवर तोडगा काढणे अणि जिंकणे हीच वृत्ती असल्याने बहुतेक पृथ्वीवरील बाकी जिवांना मागे टाकून ह्याने पृथ्वीवर राज्य केले असावे..मग ही वेदना काय चीज!
सहाजिकच वैद्यकीय क्षेत्रात जाणवणार्‍या ह्या मोठ्या समस्येवर फार पूर्वीपासून संशोधन चालू आहे. सुरुवातीला अगदी अफू, दारू, काही विशिष्ट वनस्पती इत्यादी पासून सुरू झालेला हा प्रवास आता अत्याधुनिक उपकरणे, मेडिसिन, इंजेक्शन्स, ऑपरेशन ते अत्याधुनिक पेन मॅनेजमेंट मधील नवनवीन तंत्रज्ञान इथपर्यंत पोहोचला आहे. सुमारे १०० वर्षापूर्वी केवळ विविध आजारांवर मात करून जीवनमान वाढवणे हेच एक ध्येय असणारा मानव आता क्वालिटी ऑफ़ लाइफ याकडे जास्त लक्ष द्यायला लागला आहे. मग त्यामध्ये वेदना विरहित आयुष्य कसे जगता येईल यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये निरोगी राहण्यासाठी शरीराची काळजी, व्यायाम, न्यूट्रिशन इत्यादी गोष्टी आल्याच…या मानवाच्या वेदनांच्या विरुद्ध युद्धात वैद्यकिय क्षेत्र कसे मागे राहील? वैद्यकीय क्षेत्राने देखील कंबर कसली अणि ह्या वेदनानिवारण शास्त्राचा (Interventinal Pain Management ) जन्म काही दशकांपूर्वी झाला. सुरुवातील केवळ अतिप्रगत राष्ट्रांमध्ये असलेल्या ह्या शास्त्राने मागील दोन दशकांत विशेषता मागील दहा वर्षात चांगलीच उभारी घेतली आहे. अगदी दोन दशकांपूर्वी केवळ दिल्ली, कलकत्ता, मुंबई ह्या मेट्रो शहरांमध्ये असणारं हे शास्त्र आता नाशिक, पुणे, नागपूर या सारख्या शहरांमध्ये देखील उपलब्ध झाले आहे अणि दोन दशकांपूर्वी केवळ बोटावर मोजता येईल येवढे डॉक्टर ह्या क्षेत्रात कार्यरत असताना आता भारतभरात ५०० हून अधिक डॉक्टर ह्या विषयात पारंगत झाले आहेत अणि ते काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सेवा देऊन वेदना निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दहा वर्षांत केवळ डॉक्टरांचा आकडा वाढला असे नाही तर कल्पने पलिकडे जाऊन विविध वेदनांवर मात करण्यासाठी ह्या शास्त्रामध्ये विविध उपचार पद्धती, उपकरणे, तंत्रज्ञान अणि संशोधन केले जात आहे. जुनाट आजार अणि वेदनांनी ग्रस्त असणार्‌या रूग्णांना त्याचा फायदा होऊन त्यांचे आयुष्य सुखकर होताना दिसत आहे.
जुनाट असे मणक्याचे, नसांचे, स्नायूंचे, सांध्याचे आजार व वेदना निवारण आता काहीसे सोपे व कमी खर्चिक झाले आहे. गंभीर अशा चेहर्‍यावर असणार्‌या, कॅन्सर मुळे होणार्‌या वेदना आता कमी करणे सोपे झाले आहे.
एवढे जरी असले तरी अजूनही पाहिजे तसे जनसामान्यांना या शास्त्राबद्दल पुरेशी अशी माहिती उपलब्ध नाही किंबहुना वैद्यकीय क्षेत्रामधील नवनवीन गोष्टी जनमानसात लवकर पोहचत नाहीत हे देखील खरेच अणि त्यामुळेच खूप सारी सामान्य जनता ह्या साध्या सोप्या उपचारांपासुन वंचित राहत आहे अणि वेदनादायक आयुष्य जगत राहताना दिसतेय. आजही विविध वेदनांनी ग्रस्त असे रुग्ण ह्या हॉस्पिटल मधून त्या हॉस्पिटल मध्ये, एक उपचार झाल्यानंतर दुसरा उपचार करत फिरताना दिसतात. कधी कधी कंटाळून विविध बाबा- बुवा मंडळी यांच्या आहारी जाताना दिसतात, अगदी आत्महत्या देखील करण्यापर्यंत वेळ काही व्यक्तींवर आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ वैद्यकीय क्षेत्रानेच नव्हे तर विविध सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे, शासकीय व्यवस्था या सर्व स्तरावर कार्य होणे गरजेचे आहे. सर्वानी मिळून वेदना व वेदना निवारण शास्त्राबद्दल अधिकाधिक माहिती समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. हे सर्व झालेच तर सुदृढ व निरोगी भारताचे स्वप्न साकार होईल.

पेन मॅनेजमेंटविषयी कुठलीही माहीती हवी असल्यास डॉ. विशाल गुंजाळ, मो:-९४०३०१५८८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News