तलवरबाजीची चुरशीची लढत बघताना प्रमुख पाहुणे नानासाहेब महाले, बलवंतसिह, आनंद खरे, अशोक दुधारे, दत्ता पाटिल, नितिन हिंगमीरे, राजू शिंदे आदी.
नाशिक :- नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणी दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने नाशिक येथे दिनांक 21, 22 जुलै, २०१९ दरम्यान
” ९व्या मिशन ऑलीम्पिक ” राज्य तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नाशिकच्या कालिका मंदिर ट्रस्टच्या हॉल मध्ये या
स्पर्धाला मोठ्याउस्ताहात सुरवात करण्यात आली. या
स्पर्धेचे उदघाटन आज दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ०५. ३० वाजता मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्लोबल वेलफेअर सोसायटीचे चेयरमेन डॉ. बलवंतसीह, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीड़ा संघटक आनंद खरे, नाशिक जिल्हा तलवारबजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटिल, भारतीय तलवारबजी असोसिएशनचे खजिनदार तथा महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे नितिन हिंगमीरे आदी मान्यवर उपस्थीत होते.
यास्पर्धेमध्ये १४ वर्षे मुले आणि मूलीच्या गटाचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्हाचे एकूण २३० खेळाडू सहभागी झाले आहेत. या लहान वयातच मुलांना स्पर्धेचा अनुभव मिळल्यास आपले खेळाडू ऑलीम्पिक जातील यात शंकाच नाही असे नानासाहेब महाले यानी सांगितले. उदघटनानंतर स्पर्धांना सुरवात झाली.उदघटनानंतर स्पर्धांना सुरवात झाली.
यामध्ये खालील खेलादुनी विजय मिळवून चांगले प्रदर्शन केले.
आजचे रिझल्ट :-
मूली – फैइल 1) रोहिनी पडवी 2) प्रभावती गायकवाड 3) साक्षी साबले ४) अद्या अहेर
ईपी – पूनम जाधव 2) तंर्षक शिंदे ३) मनीषा जाधव 4) उज्वला दलवी





