परिस्थितीवर मात करून प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूची नेहमीच दखल – शिवसेना महानगर प्रमुख महेश बडवे.
यशवंत व्यायाम शाळेचे राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू धीरज महाले, समाधान शेंडगे आणि सौरभ महालकर, यांचा नाशिक महानगर शिवसेनेतर्फे शिवसेना महानगर प्रमुख महेश बडवे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र टिळे, रवी गायकवाड, सुनील निरगुडे, रणजित हिंगमिरे, महिंद्र बडवे, शशांक वझे, नितीन हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते. या तीनही खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले.

या तीनही\ खेळाडूंची आर्थिक परिस्थिती बेताची असून हे खेळाडूं आपले शिक्षण करून नियमित व्हॉलीबॉलचा सरावही करतात.
या खेळाडूनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविले आहे. समाधान शेंडगेचे वडील वाहन चालक असून धीरज महालेचे वडिल पेंटिंगचे काम करतात. या दोन्हीही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या १२वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवून परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सौरभ महालकरचे वडील रिक्षा चालक असून सौरभ डिप्लोमा परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला असून तो अर्थार्जनासाठी आपल्या काकाला त्याच्या व्यवसायात मदत करतो.
मागील वर्षी अश्याच परिस्थितून चहाच्या गाडीवर काम करून १०वीमध्ये ८५% मार्क मिळविणाऱ्या तन्मय घुगे या खेळाडूचा चहाच्या गाडीवर जाऊन सत्कार केला होता.
शिवसेनेच्या वतीने अश्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन आणि खेळातही चांगले प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलांचा सत्कार करून त्यांच्या वाटचालीची दखल घेण्याचे काम केले जाते असे वक्तव्य शिवसेना महानगर प्रमुख महेश बडवे यांनी केले.
यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे खेळाडू आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते.





