कझाकीस्थान येथे आयोजित अशियाई बायथल आणि ट्रायथल स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंसोबत मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडेरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख
नामदेव शिरगावकर. मिलिंद पूर्णपात्रे, शेखर खासणीस.
३) कझाकीस्थान येथे आयोजित अशियाई बायथल आणि ट्रायथल स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदकांची कमाई करणाऱ्या नाशिकच्या मेहेक तांबट आणि राधिका महाले सोबत प्रशिक्षक घनश्याम कुवर
नाशिक :- कझाकीस्थान येथे अशियाई बायथल आणि ट्रायथल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या मेहेक तांबट आणि राधिका महाले यांची भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि आपल्या खेळचे सुंदर प्रदर्शन करुन या दोन्हीही खेळाडूंनी सुवर्ण पदकला गवसणी घातली. मेहेक तांबटने ९ वर्षाखालील गटात झालेल्या स्पर्धेत २० मीटर धावणे , ५० मीटर पोहणे आणि पुन्हा २०० मीटर धावणे हे हे सर्व प्रकार प्रथम क्रमांकाने पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. तर राधिका महालेने ११ वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत प्रथम ४०० मीटर धावणे, त्यानंतर ५० मीटर पोहणे आणि पुन्हा ४०० मीटर धावणे हे सर्व प्रकार सर्वात आधी पूर्ण करून या गटात सुवर्णपदक मिळविले.
या दोन्हीही खेळाडू गेल्या चार वर्षांपासून नाशिकच्या भोसला मिलीटरी स्कुलच्या जलतरण तलावात स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे (साई) प्रशिक्षक शंकर मादगुंडी , प्रशिक्षक घनश्याम कुवर आणि विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. प्रशिक्षकांनी या दोन खेळाडूमधील टॅलेंट बघून त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिल्यामुळे राधिका आणि मेहेक यांना थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणे शक्य झाले आहे. या खेळाडूंना भारतीय बायथल असोसिएशनचे प्रमुख आणि भारतीय ऑलीम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर, भारतीय बायथल असोसिएशनचे प्रमुख मिलिंद पूर्णपात्रे, शेखर खासणीस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
मेहेक तांबट आणि राधिका महाले या दोन्हीही खेळाडू फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण घेत असून त्यांना शाळेचे आणि संस्थेचेही वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळत आहे. तसेच मेहेकचे आई आणि वडील सौ..प्रियांशी आणि संजय तांबट आणि राधिकाचे आई आणि वडील सौ. अर्चना आणि गंगाधर महाले यांचेकडून आवश्यक असलेले अतिशय महत्वाचे असे मोलाचे प्रोत्साहन आणि सहकार्य मिळत आहे.
या दोन्हीही खेळाडूंनी वयाच्या पाच वर्षांपासून पोहायला सुरवात केली आहे. त्यांची ही चुणूक लक्षात आल्यामुळे प्रशिक्षकानी त्याच्याकडे चांगले लक्ष देऊन स्पर्धामध्ये सहभागी करण्यास सुरवात केली तसेच सागरी जलतरणाचाही अनुभव मिळावा यासाठीही त्यांच्या प्रशिक्षकानी त्यांना मालवण आणि गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धातही सहभागी केले. या दोघींनीही आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवत रेस यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास संपादन केला. याचप्रमाणे या दोन्हीही खेळाडूंनी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पदके प्राप्त केली आहेत. या दोन खेळाडू भविष्यातील नाशिकच्या स्टार आहेत असा विश्वास याचे प्रशिक्षक घनश्याम कुवर यांनी यावेळी व्यक्त केला.






