नाशिक जिल्हा ऍथलेटिकस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

Jul 25, 2022

ऍथलेटीक्सचे नाव आणखी पुढे नेण्यासाठी नाशिकच्या खेळाडूंना सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल   – यतीन पटेल. एम. डी.,सिग्नेचर फूडस

नाशिक  :  नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या पंचवटी येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे ज्युनिअर गटाच्या नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज  मोठ्या उत्साहात सुरवात झाली.   या स्पर्धेचे उद्घाटन सिग्नेचर फूड्स या उद्योग समूहाचे एम. दि. हितेन पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  उद्योजक चंद्रशेखर सिंह, या स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा अथलेटीक्स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, कार्यकारी सदस्य विजय पवार, साईचे प्रशिक्षक विजेद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे हितेन पटेल यांच्या हस्ते स्टार्ट (क्लेष) देवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. यावेळी बोलतांना हितेन पटेल यांनी सांगितले कि नाशिकचे खेळाडूं ऍथलेटिकस मध्ये राज्य, राष्ट्रीय आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्थारावर आपल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे पदके मिळवत आहेत. खेळाडूंनी नाशिकची ही परंपरा अशीच कायम ठेवावी, किंबहुना यामध्ये आणखी वाढ व्हावी यासाठी आमच्या सर्व क्रीडा प्रेमींकडून कायमच सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी चंद्रशेखर सिंह, राहुल देशमुख, यांनीही अश्याच भावना व्यक्त केल्या.               या स्पर्धेमध्ये १४ वर्षे, १४ वर्षे, १६ वर्षे,  १९ वर्षे आणि २० वर्षे मुलें आणि मुलीं अश्या चार वयोगटांचा समावेश आहे. या स्पर्धेत नाशिक शहरातील विविध संस्थांच्या खेळाडूंबरोबर हरसूल, गिरणारे, ठाणापाडा, खरवंडी, निफाड, येवला, दिंडोरी अश्या सर्व भागातील खेळाडूंनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला.

उदघाटनानंतर लांब पल्ल्याच्या शर्यतीना सुरवात करण्यात आली. यामध्ये २० वर्षे मुलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत क्रीडा प्रभोदिनीच्या माणिक वाघने १६. ३०  मिनिटात हा पल्ला पार करून विजेतेपद मिळवले. तर २० वर्षे मुलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अशोक फड या खेळाडूने हे आंतर ०४. १८ मिनिटात पूर्ण करून विजेतेपद मिळवले. २० वर्षे मुलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मनोज देवरेने प्रथम, हर्षल बच्छावने दुसरा तर दिलीप गावित या खेळाडूने तिसरा क्रमांक मिळवला.  १८ वर्षे मुलांच्या लांब उडी या प्रकारामध्ये भूषण शिंदे याने सर्वात जास्त ६.१६ मीटर अशी लांब उडी घेत प्रथम क्रमांक मिळविला.

२० वर्षे मुलींमध्ये ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत गिरनारेच्या साक्षी कसबे या खेळाडूने सुंदर धाव घेत हे आंतर २२.१० मिनिटात पूर्ण करून विजेतेपद पटकावले. खरवंडीच्या छाया मोरेने दुसरा क्रमांक (२३. २१. ३० मिनिट) मिळविला. तर खराडीच्या मोनाली जाधवने हे आंतर २४.०३.२० मिनिटात पूर्ण करून तिसरा क्रमांक मिळविला.

दोन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेत सर्व प्रकारच्या स्पर्धा खेळविल्या जाणार असून या स्पर्धेतील कामगीरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती आयोजकांनी दिली.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी हेमंत पांडे, सुनील तावरगीरी, वैज्ञनाथ काळे, संदीप फुगट, विजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंच आणि तांत्रिक अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

आजच्या स्पर्धाच निकाल :-                                                                              २० वर्षे मुले ४०० मीटर धावणे : १) मनोज देवरे – प्रथम क्रमांक. २) हर्षल बच्छाव – दुसरा क्रमांक, ३) दिलीप गावित -तिसरा क्रमांक.

२० वर्षे मुले १५०० मीटर धावणे : १) ओम फड – प्रथम, २) मयूर पवार – दुसरा क्रमांक, ३) संदीप गवांदे – तिसरा क्रमांक.

२० वर्षे मुले ५००० मीटर धावणे : १) माणिक वाघ – प्रथम, २) श्रीराम चौधरी – दुसरा क्रमांक, ३)राहुल आवारे – तिसरा क्रमांक.

१८ वर्षे मुले – लांब उडी : १)भूषण शिंदे – प्रथम, २)केतन कोपरकर – दुसरा क्रमांक, ३)अविनाश शिंदे – तिसरा क्रमांक.

२० वर्षे मुली-  ५००० मीटर धावणे : १) साक्षी कसबे – प्रथम, २) छाया मोरे – दुसरा क्रमांक, ३)मोनाली जाधव – तिसरा क्रमांक.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News