डॉ. नितीन लोनगाडगे यांचे ब्रह्मगिरी मॅरेथॉनमध्ये यश

Aug 6, 2022

नाशिक – नुकत्याच झालेल्या २२ किमी ब्रह्मगिरी परिक्रमा मॅरेथॉन- २०२२ मध्ये येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सहाय्यक रासायनिक विश्लेषक डॉ. नितीन लोनगाडगे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. लोनगाडगे हे मूळचे चंद्रपूर येथील रहिवासी असून, त्यांची नाशिकमधील प्रादेशिक न्यायसहाय्यक विज्ञान प्रयोगशाळेत बदली झाली आहे. ते अ‍ॅक्टिव्ह एनर्जी ऍथलीट ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपचे संचालक आणि प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी यांच्याकडून ते हाफ मॅरेथॉनचे प्रशिक्षण घेत आहेत. सध्या ते २८ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या मॅरेथॉनची तयारी करत आहेत. योग्य प्रशिक्षण, सातत्य, निरोगी आहार आणि चांगली झोप हे त्यांच्या यशाचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News