अजिंक्य, आदित्य, निखिल, प्रणित, शुभांगी, मिथिला, रोहिणी स्नेहल यांना विविध गटामध्ये सुवर्णपदक
नाशिक : पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन आयोजित ४९ व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पीडिजेए पुणे संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह चार अधिक गुण घेतल्यामुळे सांघिक विजेतेपदाचा दावेदार ठरला. तर ठाणे संघाने दोन सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवून द्वितीय स्थान मिळविले.
पुरुषांच्या ६६ किलो गटामध्ये नाशिकच्या अजिंक्य वैद्यने कोल्हापूरच्या अनमोल पालकरला सोदेत्सुरीकोमीगोषी या डावाचे फसवे आक्रमण दाखवत अनमोलला मॅटवर लोळवले आणि होल्डमधील केसा गातामे डावाचा वापर करत मॅटवर वीस सेकंदे जखडून ठेवत सुवर्ण पटकावले. राज्य स्पर्धेतील हे अजिंक्यचे चौथे सुवर्ण पदक असून त्याने सातत्य राखत आपले राज्यातील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे. पुरुषांच्या ८१ किलो गटात अहमनगरच्या आदित्य धोपावकरने अंतिम लढतीत सोलापूरच्या प्रदीप गायकवाडला होल्डमधील केसा गातामे डावाचा वापर करत वीस सेकंदे जखडून ठेवत सुवर्ण पटकावले. नगरच्या आदित्यचे राज्य स्पर्धेतील हे एकोणीसावे सुवर्ण पदक असून बाल गटापासून खेळलेल्या प्रत्येक स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकाची परंपरा कायम राखली आहे. महिलांच्या ४८ किलो गटात सातार्याची अंतरराष्ट्रीय ज्युदोपटू रोहिणी मोहितेने अंतिम लढतीत राज्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू शायना देशपांडेला को-ऊची माकेकोमी डावाने आक्रमण करून वाझाआरी गुण घेतला आणि विजय संपादन केला.
या स्पर्धेमध्ये या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या संघाला महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे यांच्या हस्ते मानाचा विजेता चषक प्रदान करण्यात आला. तर उपविजेता ठाणे संघाला नाशिकचे जेष्ठ क्रीडा संघटक आणि ज्यूदो संघटनेचे सचिव डॉ रत्नाकर पटवर्धन यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला, यावेळी डॉ सतीश पहाडे, रवी मेतकर, विजय पाटील, रवी पाटील, अर्चना पहाडे, जयेंद्र साखरे, माधव भट यांसह स्टेडीयम व्यवस्थापक ताम्हणकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश वाघचौरे यांनी केले. स्पर्धेचे सुंदर आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र ज्युदो संघटनेने नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे योगेश शिंदे, सुहास मैद, स्वप्नील शिंदे, नामदेव कचरे भगवान दराडे, तुषार मालोदे, सानु पाठक, गौरव पगारे आदींचे कौतुक करून आभार मानले.
स्पर्धेचा निकाल :- सर्वसाधारण विजेता संघ – पुणे जिल्हा ,
सर्वसाधारण उप विजेता संघ – ठाणे जिल्हा

स्पर्धेचा गटवार निकाल
महिला गट – ४४ किलो खालील
सुवर्ण- मिथिला भोसले ठाणे ,
रौप्य- साक्षी कांबळे , क्रीडा प्रबोधिनी
कांस्य- जीनत पठाण गोंदिया,
कांस्य – मृण्मई साठे पुणे
,महिला गट – ४८ किलोखालील
सुवर्ण- रोहिणी मोहिते, सातारा
रौप्य- शायना देशपांडे ठाणे ,
कांस्य- जयंती पाटील, कोल्हापूर
कांस्य- ऋतुजा इंगळे ,अमरावती
महिला गट – ५२ किलो खालील
सुवर्ण- स्नेहल खावरे, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य- मधुरा कुलकर्णी, नागपुर
कांस्य- भक्ति भोसले ठाणे
कांस्य- दीक्षा मडवी, वर्धा
महिला गट – ५७ किलो खालील
सुवर्ण- शुभांगी राऊत, नागपुर
रौप्य- अश्विनी सोलंके, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य- पियुषा ढमाले, पुणे
कांस्य- साक्षी बनसोडे, सातारा
पुरुष गट – ५६ किलो खालील
सुवर्ण- साबिर चव्हाण, यवतमाळ
रौप्य- हरिष चौधरी, धुळे
कांस्य- अभिषेक पट्टणशेट्टी, सांगली
कांस्य- केविन अटकर, नागपुर
पुरुष गट –६० किलो खालील
सुवर्ण- प्रणीत गोडसे, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य- प्रथम गौरव, मुंबई
कांस्य- महेश माने, पुणे
कांस्य- अवधूत पाटील, कोल्हापूर
पुरुष गट – ६६ किलो खालील
सुवर्ण- अजिंक्य वैद्य, नाशिक
रौप्य- अनमोल पालकर कोल्हापूर
कांस्य- अथर्व चव्हाण, पुणे
कांस्य- ईशान कनोजिया, मुंबई
पुरुष गट – ८१ किलो खालील
सुवर्ण- आदित्य धोपावक, अहमदनगर
रौप्य- प्रदीप गायकवाड, सोलापूर
कांस्य- प्रणव पाटील, सांगली
कांस्य- बालाजी ए एस, पुणे
पुरुष गट – १०० किलोवर
सुवर्ण- निखिल सुवर्ण, ठाणे
रौप्य- आदित्य परब, पुणे






