२६ जुलै या कारगिल विजय दिनानिमित्त कालिका देवी मंदिर ट्रस्ट , क्रीड़ा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फौडेशन यांच्या वतीने आयोजित जवानांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित जावं आणि प्रमुख पाहुणे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, रविंद्र नाईक, केशव (अण्णा) पाटिल. सुभाष तळाजिया, दत्ता पाटील, अशोक दुधारे , अविनाश टिळे , आनंद खरे, नितीन हिंगमिरे, राम पाटील, बिरारीस सर, मनीषा काठे आदी.
नाशिक :- कालिका देवी मंदिर ट्रस्ट , क्रीड़ा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फौडेशन यांच्या वतीने कालिका देवी मंदिरच्या हॉलमध्ये २६ जुलै या कारगिल विजय दिनानीमीत्त भारताचे रक्षण करणाऱ्या ३० सैनिकांना आणि शाहिद जवानांच्या कुटूबीयांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानीतामध्ये कारगिल युद्धात भारतातर्फे प्रत्यक्ष लढून पाकिस्थानला चारी मुंडया चीत करणारेआमींचे माणिक निकम, शहीद स्क्वार्डन लिडर निनाद मांडवगणेचे वडील अरुण मांडवगणे एरफोर्सचे सुरेश महाडिक, भास्करराव देवरे, सुभाष दुसाने, एस. आर. जोशी , सतीश राजपूत, जगन्नाथ क्षीरसागर, कॅ. सुरेश आव्हाड, बाळासाहेब जाबराव, बी. के. कमलाकर सावकार, ज्ञानेश्वर गोराडे, सुभाष पाटील, शिरीष मांडे , रवींद्र करंजे, पद्माकर देशपांडे, उद्धव इनामदार, वसंत जगताप आदींचा समावेश होता . सन १९९९ ला कारगिल येथे आपल्या भारतीय जवानानी आपल्या सर्व भारतीय नागरीकांसाठी आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या पराक्रमची शर्थ करुन पाकीस्थानच्या सैन्याला चीतपट करुन २६ जुलै, १९९९ रोजी विजय संपादन केला. याची आपण जाणीव ठेवली पाहीजे या उद्देशने दरवर्षी २६ जुलै रोजी सैनीकचा सन्मान केला जातो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे , नाशिकचे जिल्हा क्रीडा अधीकारी रविंद्र नाईक, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव (अण्णा) पाटिल. खजिनदार सुभाष तळाजिया, दत्ता पाटील, अशोक दुधारे , अविनाश टिळे आदी मान्यवरांच्या हस्ते सैनीकांना श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले. तसेच सुरवातीला सर्व जवानांना राखी बांधून त्यांना ओवाळण्यात आले.
यावेळी बोलतांना क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले की जवानाच्या कर्तबगारीमुळे आपण सुरक्षीत आहोत, त्यांच्या या कर्तबगरीची जाणीव ठेवून त्यांच्या सन्मान करण्याचे काम कालिका मंदिर, क्रीड़ा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फौडेशन या संस्था करतात याचे कौतुक केले. रवींद्र नाईक यांनीही भारताच्या जवानांचे ही कामगिरी ऑलीम्पिक मेडलपेक्षाही फार मोठी आहे असे सांगून जवानांच्या शौर्याचे कौतुक केले.
सत्कारार्थीतर्फे कारगिल युद्धात पाकीस्थान विरुध्द लढ़लेले माणिक निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितले की या युद्धाच्या वेळी कारगिल येथील टेम्परेचर वजा ४० ते ४५ डिग्री इतके होते. तरीही देशासाठी काही तरी करून दाखविण्याची संधी आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही सर्व सैनिकांनी या टेम्परेचरचा, खाण्यापिण्याचा, झोपेचा कसलाच विचार न करता देशाला विजय मिळवून देण्याच्या ईर्षेने पाकच्या सैन्याला नामोहरण करून हा विजय मिळविला,याचा आम्हाला अभिमान तर आहेच परंतु आमच्या या विजयाची दखलघेऊन आम्हाला अश्या प्रकारे सन्मानित केले जाते यासाठी त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तर शाहिद निनाद मांडवगणे यांच्या वडिलांनी सांगितले की निनादच्या निधनानंतरही यांची पत्नी विजयी यांनी मनाशी जिद्द बाळगून मी देखील देशाची सेवा करणार या उद्देशाने स्वतः एअरफोर्स मध्ये भरती होऊन हैद्राबाद येथे ट्रैनिंग जॉईन केले आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक दुधारे यांनी केले तर जवानांच्या कार्याची माहिती आनंद खरे यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, राम पाटील, दीपक निकम, मनीषा काठे, प्राजक्ता देशपांडे आदिंनी परिश्रम घेतले.






