राज्यस्तरीय जिम्नास्टिक पंच परीक्षेचे आयोजन

Aug 22, 2022

नाशिक : जिल्हा जिम्नास्टिक असोसिएशन तर्फे राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, येथे दिनांक २० ते २२ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये आर्टिस्टिक्स पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.
या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या ५६ पंचानी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक संजय मोरे आणि आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका शर्वरी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
या प्रशिक्षण शिबिरात सर्व तांत्रिक बाबींची माहिती दिली जात असून नियमामध्ये वेळो-वेळी होणाऱ्या बदल यांची माहिती दिली जात आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना संजय मोरे यांनी सांगितले की स्पर्धेत पंचांची भूमिका फार महत्वाची असते. त्यामुळे पंचांनी आणखी सक्षमपणे आपली जबाबदारी पार पदवी यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिका द्वारे त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक भास्कर कवीश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक राकेश केदारे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधन डोणगावकर यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक चंद्रशेखर सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यानंतर पुढील राष्ट्रीय स्तरावरील पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबीर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे होणार आहे. सध्या नाशिकमध्ये सुरु असलेल्या पंच परीक्षेत उत्तीर्ण होणारे पंच या राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी पात्र ठरतील अशी माहिती आयोजकांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News