नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन

Aug 23, 2022

नाशिक  : नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स असोसिएशनच्या  वतीने आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली दिनांक २६ आणि २७ ऑगस्ट. २०२२ दरम्यान नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी तेथील सिंथेटिक ट्रॅकवर कनिष्ठ  गटाच्या मुले आणि मुलींसाठी  महाराष्ट्र राज्य  ऍथलेटिक्स स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेमध्ये १४ वर्षे आणि १६ वर्षे या दोन गटांचा समावेश असणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचे सुमारे ५३० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून हे निवड झालेले खेळाडू रायपूर, छत्तीसगड येथे दिनांक ०९ ते ११ सप्टेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील अशी माहीत या स्पर्धेचे आयोजक नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स  असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र  ऍथलेटिक्स  असोसिएशनचे सरचिटणीस सतीश उच्चल आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे तज्ञ तांत्रिक अधिकारी आणि पंच आपली जबाबदारी सांभाळणार आहेत.
या राज्य स्पर्धा उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार  होत्या. परंतु सततच्या पावसामुळे तेथे स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही.  त्यामुळे नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स  असोसिएशनने या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी पार पाडण्याचे ठरवले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी हेमंत पांडे, सुनील तावरगिरी, विजय पवार, वैदनाथ काळे, संदीप फुगट  आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News