राज्य अजिंक्यपद फुटसॉल स्पर्धेला मोठ्या उस्ताहत सुरवात. या सांघिक खेळामुळे सांघिक भावना जपली जाते – सुनील पूर्णपात्रे

Aug 1, 2019

नाशिक  :-  नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीड़ा संकुलात महाराष्ट्र राज्य अंजिक्यपद  फुटसॉल स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलांच्या गटाचा समावेश आहे.  या स्पर्धेचे उदघाटन भारतीय  फुटसॉल   फेडेरेशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे  यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नितीन हिंगमिरे, दिपक निकम, राजू जाधव, पांडुरंग गुरव आदी मान्यवर उपस्थीत होते.याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले की फूटसॉल हा फूटबॉलच असून हा खेळ छोटया क्रीडांगणात खेळला जातो त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना यामध्ये सहभागी होता येते तसेच हा खेळ सांघिक असल्यामुळे याद्वारे सांघिक भावना जपली जाते असे सांगितले. 
 या स्पर्धेत मुंबई शहर, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे, पालघर, औरंगाबाद, नाशिक, अश्या महाराष्ट्राच्या विविध जिल्यांचे संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धा प्रथम लिग आणि  त्यानंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचे चार गट करण्यात आले असून आज उदघाटनानंतर दिवसभर २४ लीगचे सामने खेळविण्यात आले. यामध्ये अनुक्रमे ” अ ” गटातून पुणे जिल्हा,  “ब गटातून  मुंबई शहर,  ” क  ” गटातून पुणे शहर आणि  “ड ”  गटातून औरंगाबाद जिल्हा या चार संघानी गटवार साखळीत आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावून बाद फेरीत प्रवेश केला. 
या स्पर्धेच्या सुयोग्य आयोजनासाठी महाराष्ट्र असोसिएशनचे सी.ई. ओ. प्रवीण शिरगांवकर, आयोजन सचिव रणजित भारद्वाज, या स्पर्धेचे संचालक डॉ. विल्सन अँड्रुज यांच्या मार्गदर्शनाखाली  फूटसॉल फेडेरेशनचे पंच प्रमुख डेमेन्स ग्रोवर, प्रकाश करकेरा, राहुल मोरे, तेजस हिंगे, निहार शहा आदी तांत्रिक बाजू सांभाळत आहेत. 
 
 महाराष्ट्राच्या संघाची निवड – या स्पर्धेतील  कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार असून हा निवड झालेला संघ पुढील महिन्यात केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल असे यावेळी सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले. 
 
बाद फेरीत प्रवेश केलेले संघ पुढीलप्रमाणे – १) पुणे जिल्हा २)  मुंबई शहर, ३) पुणे शहर , ४)  औरंगाबाद  उद्या दोन उपांत्य सामने खेळविले जातील आणि त्यानंतर अंतिम सामना खेळविला जाईल अशी माहिती जिल्हा  सचिव दीपक निकम यांनी दिली.   
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद खरे, दिपक निकम, नितीन हिंगमीरे, चिन्मय देशपांडे,  आदी प्रयत्नशील आहेत.   
 
उद्या होणारे उपांत्य सामने खालीलप्रमाणे 
१) पुणे जिल्हा विरुद्ध  औरंगाबाद  
 २)  मुंबई शहर विरुद्ध   पुणे शहर ,
फोटो :-  महाराष्ट्र राज्य फूटसॉल स्पर्धाच्या उदघाटनानंतर खेळाडूंना मोलाच्या टिप्स देतांना फेडेरेशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे. 
२) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फूटसॉल स्पर्धांतील काही चुरशीचे क्षण 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News