नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

Aug 27, 2022

पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नगर, सांगलीच्या खेळाडूंचे वर्चस्व

नाशिक  : नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स असोसिएशनच्या  वतीने आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली दिनांक २६ आणि २७ ऑगस्ट. २०२२ दरम्यान नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी तेथील सिंथेटिक ट्रॅकवर कनिष्ठ  गटाच्या मुले आणि मुलींसाठी  महाराष्ट्र राज्य  ऍथलेटिक्स स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.   या  स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनचे सचिव सतीश उच्चल नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे सचिव सुनील तावरगिरी,  विजय पवार, वैदनाथ काळे, संदीप फुगट  यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरवात करण्यात अली.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या ५१८ खेळाडू सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.
या स्पर्धेमध्ये पुणे. मुंबई शहर,  मुंबई उपनगर,.नागपूर,  नगर, सांगली, लातूर, नाशिक आदी जिल्ह्यांच्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून विविध प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
  यामध्ये  १६ वर्षे मुलीच्या ८०० मीटर धावणे शर्यतीत नाशिकच्या स्मितल मोरेने हे अंतर सर्वात आधी पार करून प्रथम क्रमांक मिळविला. सातारच्या शिवानी डोंगरेने दुसरा तर पुणेच्या कृशाली जगतापने तिसरा क्रमांक पटकावला.  १०० मीटर धावणे स्पर्धेत १६ वर्षे मुलांमध्ये लातूरच्या मोसीन  मोमीन ने हे अंतर सर्वात कमी वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. तर १६  वर्षे मुलीच्या १०० मीटर धावणे शर्यतीत अहमदनगरच्या दिव्यांगी लेढेंने सर्वात वेगाने हे अंतर पार करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. १६ वर्षे मुलांच्या २०००  मीटर धावण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सात्विक वर्माने प्रथम क्रमांक मिळविला,नागपूरच्या माधव गुप्ताने दुसरा तर चंद्रपूरच्या ऋषिकेश सोनावनेने तिसरा क्रमांक मिळविला.   उंच उडी प्रकारात १६ वर्षे मुलींमध्ये पुण्याच्या नलिनी बिजूने सर्वात उंच उडी घेत प्रथम क्रमांक मिळविला.  रायगडच्या श्वेता बंकरने दुसरा तर मुंबई शहरच्या शरची जोगनीने तिसरा क्रमांक मिळविला.
       या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून हे निवड झालेले खेळाडू रायपूर, छत्तीसगड येथे दिनांक ०९ ते ११ सप्टेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील अशी माहीत या स्पर्धेचे आयोजक नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स  असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी दिली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्याचे तज्ञ तांत्रिक अधिकारी आणि पंच  जबाबदारी सांभाळत  आहेत.
तर या स्पर्धेच्या आयोजनासाठी हेमंत पांडे, सुनील तावरगिरी, विजय पवार, वैदनाथ काळे, संदीप फुगट  आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.
या राज्य स्पर्धा उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार  होत्या. परंतु सततच्या पावसामुळे तेथे स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही  हे  कळविल्यामुळे ही  जबाबदारी नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स  असोसिएशनने स्वीकारून नाशिकच्या सिंथेटिक ट्रॅकवर  चांगल्या प्रकारे आयोजन केले याबद्दल महाराष्ट्र  ऍथलेटिक्स  असोसिएशनचे सचिव सतीश उच्चल  यांनी आयोजकांचे कौतुक केले.
उद्या सकाळी ७. वाजता स्पर्धांना उर्वरित सुरवात होणार आहे अशी माहिती तांत्रिक समितीच्या वतीने देण्यात आली.
आजच्या स्पर्धाचा निकाल :
 १६ वर्षे  मुले –
१) २००० मीटर धावणे :१)  ऋत्विक वर्मा ( कोल्हापूर) -प्रथम , माधव गुप्ता ( नागपूर)     द्वितीय  ३) ऋषिकेश सोनावणे ( चंद्रपूर) – तृतीय.
८०० मीटर धावणे :   १) विद्वेष शेट्टी  (पुणे) – प्रथम  २) वेदांत चव्हाण ( नाशिक ) व्दितीय, ३) प्रतीक भावसार ( रायगड ) – तृतीय.
 १४ वर्षे मुले  लांब उडी  : १) केतन पाटील (सांगली ) – प्रथम  २) संस्कार सपकाळ ( कोल्हापूर ) व्दितीय, ३) अश्वेन्धु पाटील ( पुणे ) – तृतीय.
१६ वर्षे मुलीं – २००० मीटर धावणे :  १)   जान्हवी हर्डीकर ( नागपूर ) – प्रथम  २) स्वाती कळोले  ( कोल्हापूर ) व्दितीय, ३)गायत्री शिंदे  (ठाणे ) – तृतीय.
उंच उडी :  १)   नलिनी बिजू ( पुणे) – प्रथम, २) श्वेता बँकर ( रायगड) –  व्दितीय, ३)शराणी जोगणी   (मुंबई ) – तृतीय.
८०० मीटर धावणे : १)   स्मितल मोरे  (नाशिक ) – प्रथम  २) शिवानी डोंगरे ( सातारा  ) व्दितीय, ३) कृष्णाली जगताप  ( पुणे  ) – तृतीय.
  गोळा फेक   –  १) आवेश रहाटे (मुंबई उपनगर  ) – प्रथम, २) वेगा शहा  ( मुंबई शहर ) –  व्दितीय, ३) निकिता दवणे  (नगर ) – तृतीय.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News