भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस तथा भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री राजीव मेहता यांचे वाढदिवसा निमित्त *४ थी चॉइल्ड कप (१० वर्षा आतील ) व १० वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा दि. ६ ते ८ ऑगस्ट २०१९ , नाशिक

Aug 3, 2019

नाशिक दिनांक ३ ऑगस्ट :- महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन, नाशिक  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तलवारबाजी असोसिएशनच्या अधिपथ्याखाली नाशिक येथे दिनांक ६ ते ८ ऑगस्ट, २०१९ रोजी  ” ४ थी चॉइल्ड कप (१० वर्षा आतील ) व १० वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी ”  स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या पंचवटी येथील  विभागीय क्रीडा संकुलच्या इनडोअर हॉलमध्ये  करण्यात आले  आहे.  या स्पर्धेच्या निमित्ताने आज दिनांक ३ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धा संयोजक तथा तलवारबाजी फेडरेशनचे खजिनदार  अशोक दुधारे, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, सचिव राजू शिंदे, कालिका मंदिरचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील,  सदाशिव नाईक, आनंद खरे, नितीन हिंगमिरे आदी उपस्थित होते. अशोक दुधारे यांनी या स्पर्धेची खालीलप्रमाणे  माहिती दिली.  

या स्पर्धेत भारतातील खालील  राज्यांचे खेळाडू, पंच, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 

१) जम्मू काश्मीर , २) पंजाब , ३) हिमाचल प्रदेश , ४) चंडीगड , ५) हरियाणा , ६) दिल्ली , ७) उत्तराखंड , 

८)बिहार,  ९) उत्तर प्रदेश,  १०) झारखंड, ११) छत्तीसगड, १२)मध्य प्रदेश, १३) राजस्थान, १४) गुजरात, 

१५)गोवा, १६) आंध्र प्रदेश, १७) तेलंगाणा, १८) ओरिसा, १९) कर्नाटक, २०) तामिळनाडू, २१) केरळ, २२) आसाम,
२३) मणिपूर, २४) नागालॅड, २५) महाराष्ट्र. 

प्रत्येक  राज्यातून १६ मुले +१६ मुली +२ मार्गदर्शक + २ व्यस्थापक  असे एकूण १००० जणांचा सहभाग असेल. 

महाराष्ट्राच्या पुढाकाराने स्पर्धाना सुरवात :-  खेळाडूंच्या प्रगतीसाठी  ” चाईल्ड आणि मिनी “  या  सर्वात लहान गटाच्या स्पर्धाचा समावेश असावा असा आग्रह नाशिक जिल्हाचे पदाधीकारी अशोक दुधारे यांनी भारतीय तलवारबाजी असोसिएशनकडे सतत केला. परंतु या गटाच्या स्पर्धा आपण आयोजित कराव्या या अटीवर भारतीय फेडेरेशनने परवानगी दिली. यानुसार नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनने गेली दहा वर्ष या दोन्हीही गटाच्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या लहान गटाचा समावेश केल्यामुळे या स्पर्धामध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूनां चांगला फायदा झाला आहे. या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेऊन पदकांची कमाई केली आहे.  यामध्ये  कारण गुज्जर,  चुनीलाल,(राजस्थान ), छवी कोहली,( पंजाब )  शरयू पाटील, रोशनी मुर्तडक अभय शिन्दे ( महाराष्ट्र ) अश्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके प्राप्त केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. 

मैदाने :- या स्पर्धेसाठी ८ अद्ययावत मैदाने तयार करण्यात येणार आहेत. 

इलेक्ट्रॉनिक अँपरेटस :- या सर्व स्पर्धा इलेक्ट्रॉनिक अँपरेटसवर खेळविल्या जाणार आहेत.  

पंच :– स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच कार्यरत असणार आहेत

स्पर्धाच तपशील – उदघाटन – दिनांक ६  ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता. 

सामन्यांचे वेळापत्रक –  सकाळी ०८. ३० ते ११. ३० दुपारी ०३. ०० ते रात्री ०७. ३० पर्यंत. 

समारोप समारंभ – दिनांक ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०६. ०० वाजता होईल. 

स्पर्धेचे अंदाजपत्रक 

या स्पर्धेचा एकूण अंदाजे खर्च हा १५, ३०, ०००/- ( पंधरा लाख तीस हजार रुपये)  इतका आहे.

 यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे . 

निवास व्यवस्था – खेळाडू , पंच आणि पदाधिकारी यांचा निवास (पाच दिवस) 

 भोजन खर्च – पाच दिवस – सकाळ चहा  नास्ता, दुपारचे भोजन, दुपारचा चहा, रात्रीचे भोजन आदी. 

क्रीडा साहित्य –  पिस्ट. इलेक्ट्रॉनिक साहित्य इ. 

स्टेडियम हॉलचे भाडे, 

वाहतूक खर्च – साहित्य आणि खेळाडू वाहतूक खर्च 

पंचांचे मानधन,  

स्टेशनरी , छपाई खर्च , बॅनर्स. मंडप व्यवस्था, माईक,टेबल, खुर्ची इत्यादि. 

या स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे समिती तयार करण्यात आल्या आहेत 

*स्पर्धा संयोजन समिती *

स्वागत समिती –  १) अशोक दुधारे २) प्रकाश काटूळे ३) डॉ. उदय डोंगरे ४) राजकुमार सोमवंशी ५) दत्ता पाटील ७) राजू शिंदे
 भोजन समिती  – १)  रमेश मारवाडी   २) दिपक निकम ३)  पांडुरंग गुरव ४) ऋषिकेश शिंदे

निवास समिती :- १) स्वप्नील वाळके  २) सी.डी. रोटे  ३) अविनाश वाघ ४) मिनाक्षी जाधव
मैदान समिती –  १) राजू शिंदे २) अमोल आहेर ३) विक्रम दुधारे ४) अक्षय देशमुख  ५) मयूर गुरव

प्रसिद्धी समिती  – १) आनंद खरे २) शशांक वझे  ३) दिपक निकम ४) मनोहर गायकवाड ५) मनिषा काठे
वाहतूक समिती –   १) पांडुरंग गुरव  २) नितीन बाविस्कर ३) ऋषिकेश शिंदे ४) कुणाल अहिरे ५)  लक्ष्मण पेलमाले
उद्घाटन व समारोप –  १) नितीन हिंगमिरे २) विलास पाटील  ३)) चारुलता सूर्यवंशी ५) सी. डी. रोटे
मेडल्स , मोमेन्टो – १) आनंद खरे २) चिन्मय देशपांडे ३) दिपक निकम ४) विक्रम दुधारे ५) चंद्रकांत भाग्यवंत
प्रमाणपत्र वितरण  – १) रमेश मारवाडी  २) मयूर गुरव ३) नयना नायर  ४) मनिषा काठे  ५) विलास पाटील ६) कुणाल अहिरे. 

प्रथोमोपचार समिती – या ठिकाणी प्रथोमोपचार सुविधा असणार आहे.  यासाठी दोन वैदिकीय तज्ञ संपूर्ण स्पर्धा काळात उपस्थित राहणार आहेत. 

तरी नाशिककरांनी या स्पर्धेला उपस्थित राहून भारतातून आलेल्या खेळाडूंना प्रोस्थाहन द्यावे असे अवाहन स्पर्धा आयोजक अशोक दुधारे, दत्ता पाटील,  नितीन हिंगमिरे, राजू शिंदे आदिंनी केले आहे.  

 या स्पर्धेच्या आयोजनासाठी दत्ता पाटील, राजू शिंदे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, दिपक निकम, मनिषा काटे, राजू जाधव, पांडुरंग गुरव , मधुकर देशमुख, कुणाल अहिरे, विक्रम दुधारे, राहुल फडोळ, इ, प्रयंत्नशिल आहेत. 

                                                              आनंद खरे 

                                                       प्रसिद्धी प्रमुख 

                                    मो. ७०८३०५३२२१

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News