नाशिक, :– नाशिक जिल्हा फुटसॉल असोशिएशन आणि महाराष्ट्र फुटसॉल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीड़ा संकुल येथे १३ वर्ष वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य आजिंक्यपद फुटसॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाने मुंबई शहर संघाचा ३- १ असा पराभव करुन या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, महाराष्ट्र फुटसॉल असोसिएशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे, आनंद खरे. नितीन हिंगमिरे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, फूटसॉल असोसिएशनचे सी.ई. ओ. प्रवीण शिरगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघाना मेडल्स आणि आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची कामगिरी बघून १६ संभाव्य खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघा साठी निवड करण्यात आली. या निवड झालेल्या संघाची घोषणा करण्यात आली. निवड समिती सदस्य म्हणून प्रकाश कारकेरा, निशांत मार्लीगकर आणि राहुल मोरे यांनी काम बघीतले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले की या लहान गटापासून खेळाडूंनी चांगली मेहनत केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होतो, तसेच शासनाच्याही काही चांगल्या योजना आहेत, त्याचाही फायदा खेळाडूंनी घाव्या असे आवाहन केले.
यावेळी अशोक दुधारे यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेतून निवड करण्यात आलेला महाराष्ट्राचा संघ तेलंगणा , हैद्राबाद येथे आयोजित राष्ट्रीय फूट सॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील असे महाराष्ट्र फूट सॉल असोसिएशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेचा निकाल
२) पुणे जिल्हा – विजेता संघ
२) मुंबई शहर संघ – उपविजेता संघ.
निवड झालेला महाराष्ट्र संघ
आर्यन कारकेरा, प्रणय चिरानी, सिद्धांत मलिक, अनिश वर्मा, अर्णव लुंकड, अझीज बागजी, भौमिक कुमार, अनुज पाटील, सत्यजित काळे,(मुंबई), ऍड्रिन जॉर्ज, क्राईस्ट डिसुझा, राहुल शर्मा रणवीर पाटील, केल्विन अँड्रीझ, अर्णव मलिक.






