भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस तथा भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री राजीव मेहता यांचे वाढदिवसा निमित्त आयोजित ४ थी चॉइल्ड कप आणि १० वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात. खेळाडूंनी मेहनत करून खेळात प्रावीण्य मिळवुन देशाचे नांव उंचवावे – चंद्रकांत कांबळे , क्रीडा सहसंचालक, नाशिक विभाग.

Aug 6, 2019

दिनांक ६  ऑगस्ट –  महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन, नाशिक  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तलवारबाजी असोसिएशनच्या अधिपथ्याखाली नाशिक येथे दिनांक ६ ते ८ ऑगस्ट, २०१९ रोजी  ” ४ थी चॉइल्ड कप (१० वर्षा आतील ) व १० वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी ”  स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या पंचवटी येथील  विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी मोठया उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक  विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे आणि कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवअण्णा पाटिल यांच्या हस्ते संपन्न  झाले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जिल्हा क्रीड़ा अधीकारी रविंद्र नाईक, नाशिक महानगरपालीकेचे  माजी स्थायी समिति सभापती राहुल ढीकले,  भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे  खजिनदार तथा महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, पांडुरंग रानमाळ, दत्ता पाटील, आनंद खरे, अविनाश टिळे आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी खेळाडूंना संबोधित करतांना चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले की या लहान गटाच्या स्पर्धामुळे कमी वयातच खेळाडूंना स्पर्धाचा चांगला अनुभव मिळतो. खेळाडूंनी याचा फायदा घेऊन आपल्या खेळात प्रगती करून देशाचे नांव उंचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि अण्णा पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. डोंगरे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोक दुधारे यांनी केले,  तर आभार आनंद खरे यांनी मानले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले.  
 स्पर्धेत भारतातील जम्मू काश्मीर , पंजाब , हिमाचल प्रदेश , चंडीगड , हरियाणा , दिल्ली , उत्तराखंड , बिहार,  उत्तर प्रदेश,  झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश,  राजस्थान, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आसाम, मणिपूर, नागालॅड,  आणि  महाराष्ट्र. असे  एकूण ८३५ खेळाडू ४० पंच आणि ३० पदाधीकरी सहभागी  झाले आहेत. 
 या स्पर्धा ईपी, फॉईल आणि सॅबर या तीन प्रकारात खेळविण्यात येत असून यासाठी  स्टेडियममध्ये आठ इलेक्ट्रॉनिक अप्रेटस लावण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम लीग पद्धतीने सामने खेळविले जाणार असून त्यानंतर उद्या दुपारनंतर बाद पद्धतीचे सामने होतील. 
आज उदघाटनानंतर चाईल्ड गटाच्या स्पर्धामध्ये मुलींच्या ईपी चाईल्ड गटात  महाराष्ट्राच्या मनस्वी पटेकर, आंध्र प्रदेशच्या बी. भावना, राजस्थानच्या मनस्वी, पंजाबच्या अन्नाप्रीत . तर महाराष्ट्राच्या जान्हवी ठोंबरे, आंध्रच्या पी. यशस्वीनी, तामिळनाडूच्या ए. लक्षावतीरानी, दिल्लीच्या भावेशा  यांनी यांनी आपले सामने जिंकून चांगली सुरवात केली आहे   
 
महाराष्ट्राच्या पुढाकाराने स्पर्धाना सुरवात :-  खेळाडूंच्या प्रगतीसाठी  ” चाईल्ड आणि मिनी “  या  सर्वात लहान गटाच्या स्पर्धाचा समावेश असावा असा आग्रह नाशिक जिल्हाचे पदाधीकारी अशोक दुधारे यांनी भारतीय तलवारबाजी असोसिएशनकडे सतत केला. आणि भारतीय फेडेरेशनने यासाठी परवानगी दिली. यानुसार नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनने गेली दहा वर्ष या दोन्हीही गटाच्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आणि याचा फायदा अनेक खेळाडूंना झाला आहे असे दिसून आले आहे. 
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू शिंदे, नितीन हिंगमिरे, दिपक निकम, किरण वसवे,  स्वप्नील वाळके , जय शर्मा, मनीषा काठे, राजू जाधव, अक्षय देशमुख, मयूर गुरव आणि तलवारबाजीचे खेळाडू परिश्रम घेत आहेत. 
आजच्या सामन्याचे निकाल :-
चाईल्ड मुली – ईपी ” बी  ” गट १) रोहिणी पाटील  (महाराष्ट्र), जी. संजना ( आंध्र) जे. सफासा  ( तामिळनाडू) ,राज स्मिता (आसाम )    
 ईपी ” सी  ” गट  – काया शहा ( महाराष्ट्र ), टी. एस. सुमित्रा ( तामिळनाडू ), हानिशा ( मध्य प्रदेश ), के. मोकिथा (तेलंगणा ).   
 ईपी ” डी  ” गट १)  जान्हवी ठोंबरे (महाराष्ट्र), पी. यशस्वीनी ( आंध्र) ए. लक्षावती रानी (, तामिळनाडू) ,  भावेशा  शर्मा (दिल्ली)  
  ईपी ” एफ  ” गट  – १) मनस्वी पटेकर,(महाराष्ट्र ) २)  बी. भावना  (आंध्र प्रदेश), ३) मनस्वी ( राजस्थान), अन्नाप्रीत  (पंजाब)
 ईपी “जी ” गट –  माधुर्या (  आंध्र ) २) ए. सुभूकिशा ( तामिळनाडू ), ३) बी. जेसी (तामिळनाडू ), अकांती जैन ( मध्य प्रदेश ).   
 
 .  

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News