4 थी चॉइल्ड कप आणि १० वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा चाईल्ड गटात महाराष्ट्राला तर मिनी गटात मणिपूरला विजेतेपद

Aug 9, 2019

दिनांक ८  ऑगस्ट –  महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन, नाशिक  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तलवारबाजी असोसिएशनच्या अधिपथ्याखाली नाशिक येथे दिनांक ६ ते ८ ऑगस्ट, २०१९ रोजी  ” ४ थी चॉइल्ड कप (१० वर्षा आतील ) व १० वी मिनी राष्ट्रीय तलवारबाजी ”  स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या पंचवटी येथील  विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते . भारतीय ऑलीम्पिक असोसिएशनचे सचिव तथा भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेत चाईल्ड गटात  महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलीनी चांगली कामगिरी करून या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर मिनी गटामध्ये मणिपूरच्या मुलांनी आणि मुलींनीही चांगली कामगिरी करून या गटाचे सर्वसाधारण विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. 
चाईल्ड गटात  मुलामंध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी  एकूण १६ गुणांची कमाई करून हे विजेतेपद पटकावले तर हरयाणाच्या मुलांना १४ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या गटात मुलीमध्ये महाराष्ट्राच्या मुलीनी हरियाणाच्याच मुलींवर मोठी आघाडी प्रस्थापित करून  १८ गुण आपल्या खात्यात जमा करून  मुलीच्या गटातही विजेतेपदावर आपले नाव कोरले. 
मिनी गटात मणिपूरच्या मुलांनी हरीयानाला मागे टाकून ३० गुणांसह विजेतेपद पटकावले. या गटात हरियाणाला उपविजेतेपद तर महाराष्ट्राच्या मुलांना २० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.  मुलींच्या गटात मणिपूरच्या मुलीनी कर्नाटकला मागे टाकत ३८ गुणांची कमाई करून विजेतेपद पटकावले.तर कर्नाटकखालोखाल चांगली कामगिरी करून पंजाबच्या मुलीनी ११ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.   
या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलोपमेंट कॉरपोर्रेशनचे सहसंचालक नितीनकुमार मुंडावरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक नानासाहेब महाले , छत्रपती पुरस्कार प्राप्त कुस्तीगीर गोरखनाथ बलकवडे, अशोक दुधारे, रुची कुंभारकर, दत्ता पाटील आनंद खरे, प्रकाश वाघ,  राजू शिंदे आदींच्या हस्ते आकर्षक चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 
या स्पर्धेसाठी आठ इलेकट्रॉनिक पिस्ट वर या स्पर्धा खेळविल्या गेल्या या सुविधांमुळे या वयापासून खेळाडूंना अत्याधुनिक सामुग्रीवर खेळण्याचा अनुभव मिळाला याचा फायदा खेळाडूंना भविष्यात नक्कीच होईल असे वक्तव्य यावेळी नितीनकुमार मुंडावरे यांनी केले तर नानासाहेब महाले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगितले की नाशिकमध्ये अशोक दुधारे आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून नवोदित खेळाडूसाठी वेवेगळे उपक्रम राबवले जातात याचा फायदा या मिनीच्या खेळाडूंनी करावा अशी प्रगती करावी असे सांगितले. 
स्पर्धाचा  निकाल – सर्वसाधारण विजेतेपद 
चाईल्ड गट मुले –  १) महाराष्ट्र संघ – विजेता ( एकूण १६ गुण ) 
२) हरयाणा संघ – उपविजेता ( एकूण १४ गुण ) 
३) कर्नाटक आणि उत्तर प्रदेश संयुक्त तिसरा क्रमांक  ( एकूण ४ -४ सामान  गुण ) 
चाईल्ड गट मुली –  १) महाराष्ट्र संघ – विजेता ( एकूण १८ गुण ) 
२) हरयाणा संघ – उपविजेता ( एकूण ०९ गुण ) 
३) तामिळनाडू संघ –  तिसरा क्रमांक  ( एकूण ०८  गुण ) 
मिनी गट मुले –  १ मणिपूर  संघ – विजेता ( एकूण ३० गुण ) 
२) हरयाणा संघ – उपविजेता ( एकूण २६गुण ) 
३) महाराष्ट्र संघ –  तिसरा क्रमांक  ( एकूण २०  गुण ) 
मिनी  गट मुली –  १ मणिपूर  संघ – विजेता ( एकूण ३८ गुण ) 
२) कर्नाटक  संघ – उपविजेता ( एकूण १७ गुण ) 
३) पंजाब  संघ –  तिसरा क्रमांक  ( एकूण ११  गुण ) 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News