महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाजाचा ” राज्यस्तरीय गुणवंतांचा गुणगौरव सोहळा ” उत्साहात संपन्न परिट – धोबी समाजाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल याची ग्वाही – आमदार डॉ. सुधीर तांबे

Aug 12, 2019

नाशिक  :-   महाराष्ट्र राज्य धोबी (परीट समाज महासंघ (सर्व भाषिक ) अंतर्गत  महाराष्ट्र राज्य कला , क्रीडा आणि सास्कृतीक मंडळ नाशिक जिल्हा यांच्या वतीने समाजातील गुणवंताच्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते काल रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी दुपारी ०३. ०० वाजता नाशिकच्या कालिका देवी मंदिर संस्थांच्या सभागृहात हा  राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा. मोठया उत्साहात पार पडला. या सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धोबी (परीट) समाजाच्या  ज्या पाल्यांनी कला , क्रीडा, शैक्षणिक,  सांस्कृतिक, सामाजिक अश्या विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविले आहे अश्या १६० पुरस्कारर्थीना यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे उदघाटन नाशिक विभाग पदवीधर संघाचे आमदार मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून .महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) चे संस्थापक अध्यक्ष मा . श्री देवराज सोनटक्के. प्रसिद्ध उद्योजक राजुशेठ आहेर,  राज्य कार्याध्यक्ष अनिल शिंदे, आरक्षण कृती समिती प्रमुख रमाकांत कदम, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, राज्य मुख्य महासचिव जयराम वाघ, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक शरद मोरे, परदेशी (धोबी ) समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुहास मोगरे, महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा अरुणाताई रायपुरे, आरोग्य, कौशल्य विकास विभाग प्रमुख राजेश मुके, लॉड्री प्रमुख सुनील पवार, युवा प्रमुख सचिन कदम, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत, संत गाडगेबाबा सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष कैलास गवळी, महाराष्ट्र कला , क्रीडा आणि सास्कृतीक मंडळ प्रमुख मनोज म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी गौरवार्थीना संबोदीत केले. त्यांनी सांगितले की विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या  पाल्यांचा सन्मान करण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र धोबी -परीट समाज महासंघाचे हे कार्य हे फार प्रेरणादायी  असे आहे. याचे मी  कौतुक करतो असे सांगून या धोबी -परीट समाजाला आरक्षण मिळावे ही मागणीही खूप दिवसापासून सुरु आहे. यासाठी मी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न कारेन तसेच या गुणवंत मुलां – मुलींना त्यांच्या करियरसाठी संपूर्ण सहकार्य करेल असे नमूद करून या पुरासवकारर्थीचे अभिनंदन केले. श्री.  देवराज सोनटक्के यांनी सांगितले की गाडगे महाराजांचे विचार सर्वत्र रुजवीण्यासाठी त्यांचे उचित स्मारक व्हावे आणि गाडगे महाराजांचे कार्य बघता त्यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली .तर राज्य कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी  आरक्षणा संधर्भात सांगितले की देशातील १३ राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेशात धोबी समाजाला अंतर्भाव  शेड्युल कस्टमध्ये केला गेला आहे. तसेच आरक्षण महाराष्ट्रात मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली.  
या गौरव सोहळ्यात  महाराष्ट्राच्या विविध जिल्हाच्या  १६० पुरस्कारार्थींचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला 
  या सन्मान सोहळ्यासाठी प्रसिद्ध व्यावसायिक राजूसेठ आहेर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.  
हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी जयराम वाघ,  मनोज म्हस्के, जिल्हाध्यक्ष शेखर परदेशी, समिती सचिव कैलास देवरे आणि त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले. 
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News