अवघ्या १ किलो वजनाच्या बाळावर नाशिकमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी, भारतातील पहिलीच घटना

Aug 13, 2019

जन्मत: अवघे १ किलो वजन असलेल्या बाळावर जन्मानंतर १८ व्या दिवशीच हृदय शस्त्रक्रिया करून त्यास जीवनदान देण्याची किमया नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात घडली असून एवढया कमी वजनाच्या बाळावर यशस्वी हृदय  शत्रक्रिया करण्याची हि देशातील पहिलीच घटना  असल्याचे प्रतिपादन येथील नवजात शिशु तज्ञ डॉ संजय आहेर व लहान मुलांचे हृदय रोग तज्ञ डॉ ललित लवणकर यांनी केले तसेच हि एवढ्या कमी वजनावरील बाळाच्या हृदयाच्या शस्रक्रीयेची जगातीलही कदाचित अशी पहिलीच घटना असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला.

   देशातील अशा पहिल्याच उपचारांबाबत अधिक माहिती देतांना नवजात शिशु तज्ञ डॉ संजय आहेर म्हणाले की, सिडको मधील स्त्री रोग तज्ञ डॉ मनीषा जगताप यांच्याकडे त्या बाळाचा ७ व्याच महिन्यात जन्म झाला. वजन कमी व अत्यवस्थ असल्याने त्यास त्वरित डॉ आहेर यांच्या निओकेअर या नवजात बाळांच्या अत्याधिक सुविधा असणा-या रुग्णालयात हलविण्यात आले.

  या बाळास वेगळा त्रास असल्याचे जाणवल्यामुळे जन्मानंतर ४ थ्या दिवशीच  २ – डी इको हि चाचणी करण्यात आली. त्यामध्ये बाळाच्या हृदयाच्या मोठ्या धमणी (रक्तवहिनीस) मध्ये अडथळा असल्याचे लक्षात आले (Coarctation of Aorta) त्यानंतर त्याच्या पायाची नाडी देखील लागत नसल्याने लहान मुलांचे हृदय रोग तज्ञ गुणवंत चाईल्ड हार्ट केअर सेंटर चे डॉ ललित लवणकर यांना पाचारण करण्यात आले. डॉ लवणकर यांनी याआधी मुंबई, कोलकत्ता तसेच कोइम्बतुर  येथे सेवा दिली असून २०१७ पासून ते नाशिकमध्ये सेवा देत आहेत.

   याप्रसंगी उपस्थित डॉ लवणकर म्हणाले की, अशा प्रकारच्या अत्यवस्थ बाळाच्या उपचारादरम्यान नवजात शिशुस नेमका काय आजार आहे हे लवकर कळाल्यास त्यावर त्वरित उपचार  करणे शक्य असते. हे वेळेवर लक्षात न आल्यास बाळ दगावू हि शकते. पण नवजात शिशु तज्ञ डॉ संजय आहेर यांच्या अनुभवामुळे हा आजार लवकर लक्षात आला.  

  डॉ लवणकर पुढे म्हणाले की, या बाळावर मुंबई येथील तज्ञांनी कमी वजन असल्याचे सांगत शस्त्रक्रियेस नकार दिला पण त्रास वाढतच होता त्यामुळेच  बाळाच्या पालकांस विश्वासात घेऊन नाशिकमध्येच शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पायोनिअर हॉस्पिटल च्या कॅथलॅबची मदत घेण्यात आली.  वजन अतिशय कमी असल्याने ओपन हार्ट सर्जरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे पायाच्या नसेतून बलून हृदयापर्यंत नेऊन बलून अॅिन्जओप्लास्टी करण्यात आली.  विक्रमी अशा अवघ्या ३० मिनिटे चाललेल्या या शस्त्रक्रियेने बाळास नवे जीवनच मिळाले.

   हि शस्रक्रिया करतांना अनेक आव्हाने होती. वजन अतिशय कमी असल्याने बाळाच्या पायाची नाडी मिळणे अवघड होते व ती न मिळाल्यास पुढील उपचार करणे अशक्यप्राय गोष्ट असते. तसेच बलून हृदयापर्यंत नेऊन फुगविण्याच्या प्रक्रीये दरम्यान पायाचा रक्तपुरवठा खंडित होऊन पायांना गॅगरीन होण्याचा देखील धोका असतो. त्याचमुळे हि शस्रक्रिया कमीतकमी वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते. ऑपरेशन नंतर त्याची पुढील देखभाल निओकेअर मध्ये करण्यात आली व बाळाचे वजन १ किलो ३०० ग्राम झाल्यानंतर त्यास डिश्चार्ज देण्यात आला. अनुभव व कौशल्य यांच्या बळावर हे यश आल्याचेही डॉ लवणकर यांनी नमूद केले.  

   उशिरा होणा-या प्रसूती, डाऊन सिंड्रोम, अनुवांशिक आजार, प्रसुतीच्या पाहिल्या ३ महिन्यातील संसर्ग, बदलती जीवनशैली यामुळे शंभरातून एका नवजातामध्ये हृदयाच्या आजाराची शक्यता असू शकते. या शस्रक्रीयेसाठी भूलतज्ञ डॉ दिनेश बोरसे यांनी सहकार्य केले.    

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News