दाउदी बोहरा जमात, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये दिनांक ६ ऑक्टोबर, २०१९ रोजी कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या कार रॅलीसाठी तयार केलेल्या वेब साईडचे अनावरण करून या ऊपक्रमाची ही सुरवात करण्यात आली. नाशिकचे पोलीस अधीक्षक मा. श्री. विश्वास नांगरे -पाटिल यांच्या हस्ते या कार रॅलीच्या
वेब साईटचे अनावरण करण्यात आले. यावेळी जामातचे धर्मगुरु जनाब अमिल सहाब मुस्ता’अली बीएस मोहिऊद्दीन, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, शाहारुख पटेल, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा समीक्षक आनंद खरे, दाउदी बोहरा जमातचे सचिव एस. के. कासीमभाई, व्हीपीवाला, एस. के. बुऱ्हानुद्दीन तस्कीन, एम. शगब्बीरभाई मर्चंट, एम. अबीदभाई नुरानी, एम. झोऐबभाई मोगरावाला, एम. मुफ्फद्दीन परवेझ, हाकिमुद्दीन कांचवला, मुस्तानसर मोगरावाला, हाझीफा जरीवाला, फराझडाक मर्चंट, आणि नाशिक जमातच्या वेगवेगळ्या विंगच्या प्रमुख महिला आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नांगरे – पाटिल यानी सांगीतले की बोहरी समजाचा माध्यमातुन समाजउपयोगी विविध चागंले उपक्रम रबवले जातात. नुकत्याच पावसामुळे बाधीत झालेल्या नागरिकांना या समाजाच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली गेली होती. या कार रॅलीचा उद्देशही फार स्तुत्य आहे. कारण या उपक्रमतुन जमा होणारा निधी हा सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. त्यामुळे या कार रॅलीसाठी प्रशाशनाकडुन सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे सांगून या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार रॅलीच्या संदर्भाची माहिती असलेली प्रेस नोटचे वाचन करण्यात आले. ते खालीलप्रमाणे आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर, २०१९ रोजी या मोटो स्पोर्ट्स रॅलीचे आयोजन दाऊदी बोहरा जमात, नाशिक याच्या वतीने करण्यात आले आहे. दाऊदी बोहरा जमातचे प्रमुख जनाब अमिल साहब मुस्ताली बाहीसाहेब याच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमासाठी दाऊदी बोहरा जमातचे ५३ वे जागतिक धर्मगुरु दाय – ऊल- मुतला डॉ. सिडेंना अली आदर मुफद्दल सैफुद्दिन (टीयू एस) सहाब यांचे मोलाचे आशीर्वाद असणार आहे. या संधर्भात या आधीही धर्मगुरूंनी निसर्गाचे संवर्धन आणि सामाजिक भाईचारा याविषीयी वेळोवेळी आपल्या उपदेशातून समाजाला मार्गदर्शन केले आहे.
नाशिकमध्ये सध्या दाऊदी बोहरा जमातचे ४५०० सदस्य आहेत. यापैकी बहुतेक सर्व व्यापार आणि उदयोग व्यवसायात यामध्ये कार्यरत आहेत. तसेच आमच्या समाजातील तरुण पिढीनेही ऍथलेटिकस, क्रिकेट, टेबल- टेनिस, बॅडमिंटन, सायकलिंग अश्या वेगवेळ्या खेळाच्या स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे.
या कार रॅलीच्या आयोजनाच्या माध्यमातून लोकांमध्ये आपआपसात सामाजिक भावना निर्माण व्हावी हा या रॅली मागील उद्देश आहे.
या कार रॅलीच्या माध्यमातून खालीलप्रमाणे काही बाबींची पूर्तता व्हावी असा आमचा हेतू आहे.
१) समाजामध्ये एकमेकाविषयी आत्मीयता तयार व्हावी. नागरिकांना झाडांचे महत्व समजावे, झाडांची जपणूक करावी , जास्तीत जास्त झाडे लावावी. जेणेकरून पूर परीस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या घटना टाळता येतील या बाबींचे महत्व या रॅली मधून समजावे.
२) नाशिकमध्ये वास्तव्यात असलेल्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये सामाजिक बंधुभाव तयार व्हावा.
३) सामाजिक बंधुभाववाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये व्यापाराची देवाण घेवाण व्हावी, असा या रॅलीच्या आयोजनाचा हेतू आहे.
संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या द्राक्षाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या या कार रॅलीमध्ये नाशिकमधील, महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रासह मोठया संख्येने सहभागी व्हावे आणि हा उपक्रम यशस्वी करण्यास आपला मोलाचा हातभार लावावा असे आवहान करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी या उपक्रमाच्या माहितीसाठी (पी आर ओ) मो. क्र. +91 9730330009 यावर संपर्क करावा.
आमची वेब साईट www.nasikjamaat.com आणि www.ttmotorsports128.com/nasik-carrally/ यावरही सर्व माहिती उपलब्ध






