नाशिक :- नाशिकच्या कै. कोंडाजी नामदेव दुधारे कला , क्रीडा आणि बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनायी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी देण्यात येणाऱ्या २२ पुरस्कारार्थीची घोषणा आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यामध्ये कला,क्रीडा, शैक्षणिक , वैद्यकीय, उद्योग, सामाजिक, अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातील २२ मान्यवरांचा सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारार्थीमध्ये डॉ. शौकत हुसेन (जम्मू-काश्मीर), डॉ. मधू गुप्ता (राजस्थान), डॉ. दिप्तेश राकेचा ( सेलंबा,नर्मदा), श्री. नंदकुमार माने (मुंबई), श्री भास्कर पडूळ ((जालना), राजेश पंडित (नाशिक), काझी रफीका महमूद ( सोलापूर), डॉ. विष्णू परमार ( राजस्थान ), श्री उद्धवराव शिंदे (बीड), श्री संतोष चव्हाण (आष्टी, बीड), साहिब दौलतपूर (दिल्ली), मिलिंद पाटील( औरंगाबाद), श्री प्रताप मोरे (नाशिक), श्री. विनोद बोराडे (परभणी), सौ. माधुरी भदाणे ( नाशिक), श्री अमित गायकवाड (पुणे), श्री अनिल झोडगे (पुणे ), आणि
डॉ. अपूर्व जाखडी (नाशिक) यांचा समावेश आहे.
या पुरस्कारार्थींची घोषणा शिव छत्रपती पुरस्स्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, क्रीडा समीक्षक आनंद खरे, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे यांनी केली.
या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन दिनांक १७ ऑगस्ट , २०१९ रोजी नाशिक येथे करण्यात येणार आहे अशी माहिती या उपक्रमाच्या प्रमुख विजया अशोक दुधारे यांनी दिली. .





