अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांच्या वाढदिवसा निमित्त १२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन

Aug 17, 2019

नाशिक दिनांक १६ ऑगस्ट :- नाशिक येथे  दि. १७ ते १८ ऑगस्ट २०१९ दरम्यान १२ व्या सब- जुनिअर राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक म.न.पा. चे मा.स्थायी समिती सभापती अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांचे वाढदिवसानिमित्त, या स्पर्धेचे आयोजन शुभ मंगल कार्यालय , बळी मंदिर जवळ , पंचवट,  आग्रा रोड, नाशिक येथे करण्यात आले  आहे.  

या स्पर्धेचे उदघाटन उद्या शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी   सायंकाळी ०५. ३० वाजता मा. नगरसेवक अनंता सूर्यवंशी याच्या हस्ते संपन्न होणार असून याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे , भाऊसाहेब निमसे , क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे , उद्योजक  शेखर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   
 या स्पर्धेत  महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याचे मुलांचे आणि मुलींचे  ६२ संघ सहभागी होणार आहेत. 
दोन दिवस खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील कामगाराच्या आधारे उत्तम खेळाडूंमधून महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र जम्परोप असो. अध्यक्ष श्री रमेश मारवाडी यांनी दिली.  
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक  जिल्हा  जम्परोप असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र महाले ,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव  विक्रम दुधारे , दिपक निकम, किरण वसवे ,स्वप्नील वाळके ,चिन्मय देशपांडे, लता खैरनार,  तन्मय कार्णिक, पांडुरंग गुरव, मनिषा काठे,  वैभव देशपुते, अमोल आहेर, अविनाश वाघ, राजू जाधव,आदी प्रयत्नशील आहेत. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News