नाशिकच्या के.एन. डी. मंडळाच्या वतीने आयोजित मातृऋण पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

Aug 17, 2019

देशातील २२ पुरस्कारर्थीचा सन्मान  
उल्लेखनायी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी के. एन डी मंडळाचे कौतुक – लहुजी राजे यांचे १३वे वंशज मा. श्री शिवाजीराजे जाधव 
नाशिक  :-   नाशिकच्या कै. कोंडाजी नामदेव दुधारे बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना  तसेच महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात येतो. 
यावर्षीही विविध क्षेत्रात असेच उल्लेखनिय कामगिरी  करणारे मान्यवर आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या माता अश्या २२ मान्यवरांना ” समाजरत्न पुरस्कार ”  आणि ” मातृरुण पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले. 
याकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लहुजी राजे यांचे १३वे वंशज मा. श्री  शिवाजीराजे जाधव, माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव,  कालिका मंदिर देवी संस्थांनचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, शिव छात्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे , अशोक दुधारे आदीच्या हस्ते या पुरस्कारर्थीना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि आकर्षक चषक  देऊन सन्मानित करण्यात आले. 
या पुरस्कारार्थीमध्ये  जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, सेलंबा,नर्मदा, मुंबई,  जालना, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, , बीड, परभणी अश्या विविध भागातील कला, क्रीडा, शैक्षणिक , वैद्यकीय, उद्योग, सामाजिक,राजकीय अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  डॉ. शौकत हुसेन ( क्रीडा क्षेत्र), डॉ. मधू गुप्ता (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. दिप्तेश राकेचा ( शैक्षणिक क्षेत्र), श्री. नंदकुमार माने (प्रशासकीय सेवा),
डॉ. अपूर्वा जाखडी (अंतराळ क्षेत्र) ,  भास्कर पडूळ (आरोग्य सेवा), राजेश पंडित (पर्यावरण क्षेत्र ), काझी रफीका महमूद ( शैक्षणिक ), डॉ. विष्णू परमार ( क्रीडा ) उद्धवराव शिंदे (सामाजिक सेवा),  संतोष चव्हाण  (राजकीय)  साहिब दौलतपूर (शैशक्षिक, सामाजिक क्षेत्र ), मिलिंद पाटील ( समाज सेवा ), श्री प्रतापराव  मोरे ( शैक्षणिक , सामाजिक क्षेत्र), श्री. विनोद बोराडे ( राजकीय क्षेत्र ), सौ. माधुरी भदाणे (सामाजिक), श्री अमित गायकवाड (सामाजिक क्षेत्र )  श्री  अनिल झोडगे (क्रीडा क्षेत्र)  याचबरोबर खेळाडूंच्या माता सौ कार्तिकी पवार, श्रीमती लतिका निन्द्रे, सौ. कल्याणी गोगटे, श्रीमती रफिकुनिस्सा अन्सारी, सौ. चंपावती देशमुख या मातांचा समावेश होता. 
या पुरस्कार वितरण  समारंभासाठी उपस्थित  असलेल्या मान्यवरांचे स्वागत मुक्ताबाई दुधारे, निवृत्ती दुधारे, परमेश्वर डोंगरे, नारायण दुधारे, अमोल कदम नितीन हिंगमिरे यांनी केले. 
यावेळी उपस्थीतांना संबोदित करतांना श्री  शिवाजीराजे जाधव यांनी सांगितले की विविध क्षेत्रात चांगले काम करून समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करण्याचे काम हे  मान्यवर पुरस्कारार्थी करत आहेत. तसेच जिजाऊमातेप्रमाणे ज्या मातांनी आपल्या मुलांच्या मागे समर्थपणे उभे राहून त्यांना क्रीडा क्षेत्रात मनाचे स्थान मिळवून दिले आहे अश्या मातांना मातृऋण पुरस्कार देऊन नाशिकच्या  के.एन. डी. मंडळाने खरोखर फार मोठे काम केले आहे. या सत्कारामुळे या मान्यवरांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची आणखी चालना मिळणार आहे असे सांगितले. 
यावेळी डॉ. शोभाताई बच्छाव यांनीही आपल्या भाषणात या आगळ्यावेगळ्या पुरस्काराच्या कल्पनेबद्दल  के. एन.  डी.  मंडळ आणि अशोक दुधारे यांचे कौतुक केले. 
यावेळी अण्णासाहेब पाटील आणि आनंद खरे  यांनीही या पुरस्कारर्थीचे अभिनंदन करून के. एन डी मंडळाच्या या उपक्रमाची प्रसंशा करून पुरस्कारार्थींना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेछया दिल्या. 
पुरस्कारार्थीच्या वतीने श्रीमती लतिका निन्द्रे, सौ. कल्याणी गोगटे, श्रीमती रफिकुनिस्सा अन्सारी,  डॉ. शौकत हुसेन, राजेश पंडित, काझी साफिखा महमूद, श्री प्रतापराव मोरे यांनी सत्काराला उत्तर देतांना के. एन. डी. मंडळाने  आमच्या कामाची दखल घेऊन आमचा सन्मान केला यासाठी आम्ही सर्व त्याचे आभारी आहोत असे सांगितले.  
  या कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक दुधारे यांनी केले. या पुरस्कारार्थींच्या उल्लेखनीय कार्याची माहिती अस्मिता दुधारे यांनी सांगितली.   या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन सौ. विजया दुधारे यांनी केले तर  सौ. कोमल दुधारे यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. 
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अशोक दुधारे, सौ विजया दुधारे, नितीन हिंगमिरे, अजिंक्य दुधारे,  कोमल दुधारे,  दिपक निकम, विक्रम दुधारे, जगदीश गोल्डे, स्वप्नील वाळके, मनीषा काठे, राजू जाधव आणि कै. के. एन. डी. बहुउद्देशीय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News