नाशिक, येवला, :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांच्या विकासासाठी मुलभूत सुविधांकरिता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला मतदारसंघात १२ विकास कामांसाठी शासनाकडून १ कोटी २० लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. या कामांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण,स्मशानभूमी सुविधा,भूमिगत गटार आणि सभामंडप बांधकाम या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.येवला तालुक्यातील पाटोदा येथील दलित वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान व रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १५ लक्ष, धामणगाव,येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक बांधण्यासाठी १० लक्ष, अंदरसूल येथील मातंग वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १० लक्ष, खिर्डीसाठे येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी ५ लक्ष, मुखेड येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १० लक्ष, चिंचोडी बु. येथील दलित वस्तीमध्ये स्मशानभूमी सुविधा करण्यासाठी १० लक्ष,मुमदापूर येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १० लक्ष, तसेच ठाणगांव दलित वस्तीमध्ये सभागृह-सभामंडप बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.
तर निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १० लक्ष, खडकमाळेगांव येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १० लक्ष, कोटमगाव येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक गटार बांधण्यासाठी १० लक्ष, धारणगांव येथील दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधणे ५ लक्ष रुपये अशा एकूण १२ कामांसाठी १ कोटी २० लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.




