नाशिक :- नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन आणि महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन याच्या वतीने आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन याच्या सहकार्याने नाशिकच्या शुभ मंगल कार्यालय , बळी मंदिर जवळ , पंचवटी, आग्रा रोड, नाशिक येथे १२ व्या नाशिकच्या शुभ मंगल कार्यालय , बळी मंदिर जवळ , पंचवटी, आग्रा रोड, नाशिक येथे १२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात झाली.
नाशिक म.न.पा. चे मा.स्थायी समिती सभापती अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित या १२ व्या मिनी आणि सब- जुनिअर गटा च्या महाराष्ट्र राज्य जम्परोप अजिंक्य पद स्पर्धेचे उदघाटन नाशिक महानगरपालीकेचे माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी याच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे , मनसेचे विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे , छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, युवा नेते सोमनाथ वडजे क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे , उद्योजक शेखर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना संबोधीत करतांना अनंता सूर्यवंशी यांनी सांगितले की जम्परोप हा खेळ उत्तम असून यामुळे खेळाडूच्या शारीरिक क्षमतेत चांगली वाढ होते त्यामुळे खेळाडूंनी लहान वयापासून या खेळात रस घेऊन आपली प्रगती साधावी असे सांगितले. यावेळी आनंद खरे यांनी सांगितले की जम्परोप हा सर्व खेळाचा गाभा आहे. या खेळामुळे आपल्या शरीराला चांगला व्यायाम मिळतो. आणि आपल्याला याचा कायमस्वरूपी फायदा होतो असे सांगितले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विक्रम दुधारे, दिपक निकम यांनी केले.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याचे ४३० खेळाडू सहभागी झाले आहेत. जम्परोप या खेळत अंतर्भाव असलेले ३० सेकंड स्पीड, डबल अंडर, तीन मिनीट इंड़युरन्स, फ्री स्टाइल या चार प्रकारांच्या स्पर्धाचा यामध्ये समावेश आहे अशी माहिती विक्रम दुधारे यांनी दिली.
उद्घटनानंतर विविध प्रकारच्या स्पर्धाना सुरवात करण्यात आली. यामध्ये ठाणे , पालघर, अमरावती, जालना, यवतमाळ. नंदुरबार अश्या विविध जिल्ह्यांच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून या स्पर्धेत रंगत आणली. १२ वर्षाआतील गटात मुलामध्ये ३० सेकंद स्पीड प्रकारात नाशिकच्या ओम भामरेने चांगले प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळविला. तर तीन मिनिट इंडूरन्स प्रकारात पालघरच्या प्रीत जैनने चांगलाखेल करून प्रथम क्रमांक मिळविला. तर ३० सेकंद डबल अंडर या प्रकारात ठाण्याच्या मानस मुंगी याने सर्वात चांगला प्रकार सादर करून प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनचे सचिव विक्रम दुधारे , दिपक निकम, चिन्मय देशपांडे, लता खैरनार, तन्मय कार्णिक, मनिषा काठे, वैभव देशपुते, अमोल आहेर, अविनाश वाघ, राजू जाधव,आदी प्रयत्नशील आहेत.
आजच्या स्पर्धाचा निकाल
आजच्या स्पर्धेचा निकाल :-
१२ वर्षे मुले :- ३० सेकंड स्पीड – १) ओम भामरे , नाशिक – प्रथम, २) जयेश ढाके, ठाणे – दुसरा क्रमांक, ३) करण राठवाल , ठाणे – तिसरा क्रमांक
डबल अंडर – १) मानस मुंगी, ठाणे – प्रथम, २) प्रफुल सावंत, ठाणे – दुसरा क्रमांक, ३) अर्जुन अलई, नाशिक – तिसरा क्रमांक.
तीन मिनिट इंड्यूरन्स – १)प्रित जैन, पालघर – प्रथम, २) इशान पठाण, ठाणे – दुसरा क्रमांक, ३) अथर्व जवारकर, नाशिक – तिसरा क्रमांक
१२ वर्षे मुली :- ३० सेकंड स्पीड – १) स्वराली कुंभार , ठाणे – प्रथम, २) विश्लेषा प्रसाद, ठाणे – दुसरा क्रमांक, ३) देवश्री म्हसकर, पालघर – तिसरा क्रमांक
डबल अंडर – १) मनस्वी पाटील,, ठाणे – प्रथम, २) पालवी समेळ , ठाणे – दुसरा क्रमांक, ३) अक्कसा खान , नाशिक – तिसरा क्रमांक.
तीन मिनिट इंड्यूरन्स – १) प्रेरणा सप्रे, ठाणे – प्रथम, २) तनिष्का पिंगळे , नंदुरबार – दुसरा क्रमांक, ३) निधी बडगुजर , नंदुरबार – तिसरा क्रमांक