नाशिक :- नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन आणि महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन याच्या वतीने आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन याच्या सहकार्याने नाशिकच्या शुभ मंगल कार्यालय, पंचवटी, नाशिक येथे १२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची आज मोठया उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेत मुलामध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर मुलीमध्ये यजमान नाशिकच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून सर्वसाधारण पदावर आपली मोहर उमटवली.
नाशिक म.न.पा. चे मा.स्थायी समिती सभापती अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित या १२ व्या मिनी आणि सब- जुनिअर गटा च्या महाराष्ट्र राज्य जम्परोप अजिंक्य पद स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः ऍड. राहुल ढिकले, सेंट फ्रान्सिस स्कुल, राणेनगरचे मुख्याध्यापक संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, युवा नेते खंडू बोडके, मधुकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक म.न.पा. चे मा.स्थायी समिती सभापती अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित या १२ व्या मिनी आणि सब- जुनिअर गटा च्या महाराष्ट्र राज्य जम्परोप अजिंक्य पद स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः ऍड. राहुल ढिकले, सेंट फ्रान्सिस स्कुल, राणेनगरचे मुख्याध्यापक संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, युवा नेते खंडू बोडके, मधुकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी खेळाडूंना संबोधीत करतांना ऍड, राहुल ढिकले यांनी सांगितले की मुलांनी घरी मोबाइल, आणि कॉम्पुटरवर गेम न खेळता मैदानात जाऊन खेळावे. यामुळे त्यांची खऱ्या अर्थाने मानसिक आणि शारिरीक वाढ होते आणि याचा फायदा त्यांना आयुष्यभर मिळतो. जम्परोप हा खेळ तर यासाठी फार चांगला असून या खेळाद्वारे खेळाडूंनी आपली प्रगती साधावी असे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विक्रम दुधारे, दिपक निकम यांनी केले.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याचे ४३० खेळाडूनी सहभाग घऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत जम्परोप या खेळत अंतर्भाव असलेले ३० सेकंड स्पीड, डबल अंडर, तीन मिनीट इंड़युरन्स, फ्री स्टाइल, ३० सेकंद स्पीड रिले आणि डबल अंडर रिले या सहा प्रकारांचा समावेश होता.
या विविध प्रकारात ठाणे , पालघर, अमरावती, जालना, यवतमाळ. नंदुरबार, नाशिक अश्या विविध जिल्ह्याच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून या स्पर्धेत रंगत आणली.
या स्पर्धेची तांत्रिक बाजू गुलाबराव पाटील, (ठाणे ) नयना नायर (ठाणे), संजय सातारकर (यवतमाळ), तन्मय कर्णिक, मुक्ता सुतार, युगंधरा पुरी, साहिल ठक्कर, वैभव दशपुते यांनी सांभाळली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनचे सचिव विक्रम दुधारे, दिपक निकम, चिन्मय देशपांडे, स्वप्नील वाळके, लता खैरनार, मनिषा काठे, रंजना बारी, अमोल आहेर, अविनाश वाघ, राजू जाधव,आदीने परिश्रम घेतले.
स्पर्धाचा निकाल
आजच्या स्पर्धेचा निकाल :-
१४ वर्षे मुले :- ३० सेकंड स्पीड – १) संतोष कोल्हापुरे, जालना – प्रथम, २) अविनाश देशपांडे , ठाणे – दुसरा क्रमांक, ३) वेड शेट्टी ठाणे – तिसरा क्रमांक
डबल अंडर – १) मुकुल उफाडे , जालना – प्रथम, २) हर्ष खताळे , ठाणे – दुसरा क्रमांक, ३) विराज काळे जालना – तिसरा क्रमांक.
तीन मिनिट इंड्यूरन्स – १) नंदकिशोर पाईकराव, जालना – प्रथम, २)कौस्तुभ सांगळे, ठाणे – दुसरा क्रमांक, ३) सुरज पंडित, नाशिक – तिसरा क्रमांक
फ्री स्टाईल – १) ओम चिंचखेडकर, यवतमाळ – प्रथम, २) नमन गंगवाल, नाशिक – दुसरा क्रमांक, ३) यशकीर्ती पाटील, ठाणे – तिसरा क्रमांक.
डबल अंडर रिले – यवतमाळ जिल्हा – प्रथम क्रमांक, २) अमरावती जिल्हा – दुसरा क्रमांक, ३) नाशिक जिल्हा – तिसरा क्रमांक.
३० सेकंद स्पीड रिले – १) जालना जिल्हा – प्रथम क्रमांक , २) ठाणे जिल्हा – दुसरा क्रमांक , ३) नाशिक जिल्हा – तिसरा क्रमांक.
सर्वसाधारण विजेतेपद :-
मुले – १) ठाणे जिल्हा – विजेतेपद
२) नाशिक जिल्हा – उपविजेता
३) जालना जिल्हा – तिसरा क्रमांक
सर्वसाधारण विजेतेपद :-
मुली – १) नाशिक जिल्हा – विजेतेपद
२) ठाणे जिल्हा – उपविजेता
३) अमरावती जिल्हा – तिसरा क्रमांक






