· अॅक्रोबॅट कम्प्लीट आणि सर्कॅडिस प्लस देतात डाउनी बुरशी आणि पावडर बुरशी तसेच इतर अनेक रोगांपासून मजबूत संरक्षण· बुरशी रोगाच्या बॅक्टेरिया मध्ये प्रतिकारशक्ती विकसित होणे रोखण्याची खबरदारी · बीएएसएफ BASF च्या द्राक्ष उत्पादकांसाठी तयारकेलेल्या रसायनांच्या मजबूत श्रेणीत महत्त्वाची भर रसायन उत्पादक कंपनी बीएएसएफ (BASF) ने आज ऍक्रोबॅट कम्प्लीट आणि सॅरकॅडिस प्लस ही दोन प्रगत बुरशीनाशके बाजारात सादर केली. भारतीय द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या पिकाचे रक्षण करणे आणि उत्पादन वाढवणे यासाठी या बुरशीनाशकांचा मोठा फायदा होईल. या नव्या औषधांची फवारणी बुरशी आणि इतर रोगांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी प्रभावी ठरेल. भारत जगातील दहा मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहे. मात्र डाउनी बुरशी, पावडर बुरशी अशा रोगांमुळे द्राक्ष उत्पादकांना पिकाचा दर्जा चांगला ठेवणे आणि उत्पादन वाढवणे आव्हानात्मक बनले आहे. ऍक्रोबॅट कम्प्लीट हे दोन शक्तिशाली घटकांचा समावेश असलेले डाउनी बुरशीपासून संरक्षण मिळविण्यासाठी हंगामाच्या आरंभी फवारण्याचे बुरशीनाशक आहे. सिरकॅडिस प्लस बीएएसएफ चे झेमिअम हे प्रभावी रसायन आणि कंपनीचे जगभरात नावाजलेले डीमिथिलेज इनहिबिटर (DMI ) रसायन यांचा मिलाफ आहे. पावडर बुरशी आणि इतरही अनेक रोगांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी ते उपयुक्त आहे. द्राक्ष पिकावर पडणा-या या दोन्ही रोगांच्या बॅक्टेरीयामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही अशी खबरदारी ही बुरशीनाशके बनवताना घेण्यात आली असल्यामुळे शेतक-याना एक विश्वासार्ह आणि प्रभावी पीकसंरक्षक मिळाला आहे. “आमच्या उत्पादनांना भारतभरातील शेतक-यांची पसंती लाभली आहे. ऍक्रोबॅट कम्प्लीट आणि सिरकॅडिस प्लस मुळे द्राक्ष पिकावरील रोगांच्या प्रतिबंधाचे एक नवे युग सुरु होईल,” असा विश्वास कंपनीचे दक्षिण आशिया कृषि सेवांचे व्यवसाय संचालक श्री राजेंद्र वेलागला म्हणाले. ” भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणा-या फळांमध्ये द्राक्ष अग्रस्थानी आहे. म्हणूनच द्राक्ष उत्पादकांशी सतत संवाद साधत त्यांच्या अपेक्षा समजावून घेण्याविषयी बीएएसएफ सतत प्रयत्नशील आहे. मेरिव्हॉन, ऍक्रिसिओ, कॅब्रिओ टॉप, झम्परो, ऍक्रोबॅट अशाबुरशीनाशकांप्रमाणेच बीएएसएफ द्राक्ष उत्पादक शेतक-याना उत्पादन सुधारण्यासाठी व्यावसायिक आणि तांत्रिक सल्लाही दिला जातो.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




