
नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिन रत्नाकर पटवर्धन, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक तसेच रवींद्र मेटकर, स्वाती कणसे, वैष्णवी कणसे, माधव भट यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन करतांना
नाशिक : मुंबई ज्युदो असोसिएशन तसेच एन.टी.बंगेरा मेमोरियल फाऊंडेशन तर्फे मुंबई येथे दि. 17 व 18 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या प्रोफेसर जिगोरो कानो आमंत्रित ज्युदो स्पर्धात नाशिकच्या विविध वयोगटातील खेळाडूंनी भरघोस पदके जिंकून उत्क्रष्ट कामगिरी केली. सदर स्पर्धे साठी महाराष्ट्रातून विविध जिल्हयातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
सुवर्ण पदक घेणारी खेळाडू :
रुक्मिणी गोसावी, रणवीर पाटील, ईश्वरी शिंदे, हार्दिक खोडके, लोकेश सानप, अनिरुध्द रुपवते, तनिष काजळे, आकांक्षा शिंदे, रुचिरा बैरागी, ईशिता सोनवणे, ईशान सोनवणे, तनुजा वाघ, ओमकार निफाडे, करुणा थटटेकर, अजिंक्य वैदय
रौप्यपदक विजते :
वैष्णवी वाघ, वैष्णवी खलाने, समीर शिंदे, राज थटटेकर, तनया जाधव
कांस्यपदक विजेते :
सिदधी जाधव, अनुज जाधव, ईश्वर माळोदे, गौरव वाडीले, सई गोसावी, दिव्या कर्डेल अजिंक्य वैदय
सदर खेळाडूंना ज्युडो प्रशिक्षिक योगेश शिंदे, स्वप्निल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.