२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त नाशिक मधील माजी खेळाडूं आणि जेष्ठ क्रीडा संघटक यांचा गुणगौरव सोहळा.

Aug 27, 2019

नाशिक  :- भारताचे महान खेळाडू तथा  हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असणारे  मेजर ध्यानचंद याचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन  हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.  या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दर वर्षीप्रमाणे यावर्षीही कालिका  देवी मंदिर ट्रस्ट आणि  क्रीडा साधना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या सहकार्याने ” २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ”  नाशिक मधील विविध खेळातील माजी राष्ट्रीय  खेळाडू आणि क्रीडा संघटक यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० . ०० वाजता  कालिका देवी मंदिराच्या सभागृहात हा गुणगौरव समारंभ पार पडणार आहे.   नाशिकची सुवर्णकन्या ऑलीम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेती सावरपाडा एक्सप्रेस  कविता राऊत – तुंगार यांच्या हस्ते या सर्व दिग्गजांचा गौरव करण्यात  आहे. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कालिका देवी संस्थांनचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील तर प्रमुख अथिती म्हणून नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे , जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हे उपस्थित असणार आहेत. 

या  सत्कारार्थी माजी खेळाडू – संघटकांमध्ये आर,आर. चव्हाण ,आबासाहेब घाडगे, मोहन चेगेडीया ,आर.के.पाटील , बाबा मेहेर, दिपक पाटील, नरेंद्र छाजेड, राधेश्याम मुंदडा,  तसेच माजी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये कारभारी सांगळे, अॅड. गोखल बलकवडे,रविंद्र मोरे, उत्तम दळवी ( कुस्ती ), चंद्रशेखर शिन्दे, शेरूभाई शेख,  श्रीमती.वर्षा रसाळ- पारोळसांडे, ( अॅथलेटीक्स),  
युनुस जामदार, मधुकर देशपांडे, बाबा शेख, रामदास होते, विजय खरोटे, ( सर्व व्हॉलीबॉल), जया तांबोळी,  अरुण नागपुरे ( बास्केटबॉल), श्रीमती सुनिता भवर, अशोक पवार , अजय रॉय ( फुटबॉल), 
वसंत पवार,( बॅडमिटिंग), संजय कुभोजकर, (टेबल टेनिस), सुधीर पैठणकर , प्रशांत भाबड (कब्बडी), रमेश वैद्य,  रतन कुयटे (क्रिकेट) , अकिल अहमद शेख,  अनसर अहमद शेख,( हॉकी ) , श्रीमती सयोगिता मारवाडी, अश्पाक शेख, (नेटबॉल), श्रीमती छाया नवले, राजेंद्र निगळ,  (फेन्सिंग), ओंकार वैरागकर, प्रवीण व्यवहारे (वेट लिफ्टीग) श्रीमती प्रणिता कुमावत,  कैलास लवांड, (खो.खो ,अॅथलेटीक्स), श्रीमती मंगल खापरे , श्रीमती मीना महाले, चंद्रकांत भाग्यवंत, (हॅन्डबॉल), मिलिंद नाठे,सुनिल खालकर, जयश्री गाजरे- पानगव्हाणे (आर्चरी), हेमंत पाटील, आणि  सोनाली आंबिलवाले ( चॉकबॉल) , 
शाम काठे, दिपक निकम, शरद नाठे, ( सायकल पोलो), प्रमोद अहिरे, श्रीकृष्ण सानप, (बॉल बॅडमिटिंन ),  श्रीमती कल्पना निरगुडे ,सलिम सैय्यद, अंजली खरोटे, (कार्फ बॉल), श्रीमती संगीता चाबुकस्वार (बॉल बॅडमिटिंन), गोरखपुरकर, राहुल ठोळे, रामा पाटील, (सॉफ्टबॉल, बेसबॉल), सागर कारंडे, (थ्रोबॉल), श्रीमती सायली वायदंडे  (टेनिव्कॉईट), मोहन धारराव, सुहास खर्डे,  (रस्सीखेच), जगदीश गोल्डे,  (सेपकटकरॉ), कु. शिवानी पाटील, (आट्यापाट्या) यांचा समावेश आहे. 
खरंतर नाशिकने इतर क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. परंतु  जुन्या काळात खेळाच्या फारश्या सुविधा नसतांनाही ६० – ७० च्या दशकापासून  नाशिकच्या खेळाडूंनी आणि संघटकांनी विविध खेळांमध्ये नैपुण्य दाखवून क्रीडा क्षेत्रातही नाशिकला वेगळी ओळख दिलेली आहे, याची माहिती आजच्या नवीन पिढीच्या खेळाडूंना व्हावी हा या गौरव सोहळ्याचा खरा हेतू आहे. तरी या कार्यक्रमासाठी नाशिकच्या सर्व खेळाडूंनी उपस्थित राहून क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या या दिग्गजाचा गौरवसोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवहान या कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.   
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक दुधारे, आनंद खरे , सुभाष तळाजीया , डॉ. प्रतापराव कोठावळे , नितीन हिंगमिरे, राजू शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News