जामुंडा हिल्स येथे हाफ मॅरेथॉनचे आयोजन

Aug 27, 2019

स्पर्धेची वेळ व तारीख –  सकाळी ६ वाजता, दिनांक २२ सप्टेंबर २०१९

स्पर्धेचे ठिकाण –  जामुंडा हिल्स, भावली डॅम जवळ, इगतपुरी. (नाशिक पासून ६० किमी)

स्पर्धेचा मार्ग – जामुंडा हिल्स – कुरुंगवाडी – आंबेवाडी – परत त्याचमार्गे जामुंडा हिल्स येथे समाप्ती
खास वैशिष्टये –  फॅमिली जॉय रन – ३ किमी रंनिंग

स्पर्धेचे स्वरुप – 
1) ५ किमी – वयोगट १५+ ते ३०, ३०+ ते ४५ आणि ४५ पेक्षा जास्त
2) २१ किमी हाफ मॅरेथॉन आणि १० किमी चँलेंज रंनिंग – वयोगट १८+ ते ४० आणि ४०+ पेक्षा जास्त

नाव नोंदणीची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९. 
नाव नोंदणीसाठी कॉल –  ९९२२२२१३९९ किंवा ९८९०९५६५४० किंवा वेबसाईट www.TeamE3.in

नोंदणी फी –  ३ किमी साठी ₹३००, ५ किमी साठी ₹६००, १० किमी साठी ₹९०० आणि २१ किमी साठी ₹१२०० फक्त त्यात प्रत्येकाला मिळेल टी-शर्ट, 
फिनिशर मेडल, ई-सर्टिफिकेट, नाश्ता, आर.एफ.आय.डी. टाइम चीप बिब. 

बक्षिसे –  २१ किमी हाफ मॅरेथॉनची बक्षिसे: प्रथम बक्षीस – ₹ ११००० रोख, व्दितीय बक्षीस – ₹ ५००० रोख, तिसरं बक्षीस – ₹ २००० रोख
१० किमी चँलेंज रंनिंगची बक्षिसे: प्रथम बक्षीस – ₹ ५००० रोख, व्दितीय बक्षीस – ₹ ३००० रोख, तिसरं बक्षीस – ₹ १००० रोख

नाशिक :-  शहरामध्ये टीम ईथ्री गेल्या दीड वर्षापासून सायकलिंगचे विविध उपक्रम राबवीत असते, त्यात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी १०० किमी ची सेन्चुरी राईड (आता पर्यंत १७ राईड) आणि शेवटच्या रविवारी वॉव (WOW) राईड म्हणजे फक्त महिलांसाठी निशुल्क सायकलिंग (आता पर्यंत ०७ राईड) तसेच आंतरराष्ट्रीय नियमानुसार नाशिक ड्युअथलॉन स्पर्धा घेण्याचा मान टीम ईथ्री ला जातो, नाशिक शहरात प्रथम आणि महाराष्ट्रात कोल्हापूर नंतर दुसरे अशी हि स्पर्धा २ वेळा घेण्यात आली होती त्यात मुंबई पुणे औरंगाबाद ठाणे येथून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते.
नाशिक हे एकेकाळी हिल स्टेशन म्हणून ओळखले जायचे, तीच ओळख परत करून देण्याचा एक प्रयत्न म्हणून जामुंडा हिल्स ह्या निसर्गरम्य परिसरात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे, ही मॅरेथॉन स्पर्धा चार प्रकारच्या अंतरात म्हणजे ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी मध्ये ४ वेगवेगळ्या श्रेणीत घेण्यात येणार आहेत अशी माहिती कपिल गिरी ह्यांनी दिली.
फॅमिली जॉय रन म्हणजे ३ किमी रंनिंग आहे. स्पर्धात्मक ५ किमी रंनिंग, वयोगट १५+ ते ३०, ३०+ ते ४५ आणि ४५ पेक्षा जास्त. २१ किमी हाफ मॅरेथॉन आणि १० किमी चँलेंज रंनिंग, वयोगट १८+ ते ४० आणि ४०+ पेक्षा जास्त. ह्या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील दोन पुरुष व दोन महिला असे ५ किमी अंतरात १८ विजेत्यांना आणि १० किमी व २१ किमी अंतरात प्रत्येकी २४ विजेत्यांना, असे एकूण ४२ विजेत्यांना रुपये १,०८,००० एक लाख आठ हजाराची बक्षिसे तेजस्वी ज्वेलर्स तर्फे मिळतील आणि सदर स्पर्धांना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक ह्यांची मान्यता प्राप्त आहे, अशी माहिती टीम ईथ्री चे सचिव धिरज छाजेड ह्यांनी दिली.
गिरीझ डेवलपमेंट कम्पनी प्रस्तुत जामुंडा हिल्स हाफ मॅरेथॉन मध्ये कमिशनर साहेब श्री. विश्वास नांगरे पाटील, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. राजेंद्र नेहेते, महेंद्र छोरीया, अनिरुद्ध अथणी अश्या अनेक मान्यवरांनी नाव नोंदणी केली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील ह्यांनी दिली. सदर पत्रकार परिषदेत सिध्दार्थ गिरी, कपिल गिरी तसेच टीम ई-थ्री चे गणेश पाटील, धिरज छाजेड, विकाश जैन, राज लुथ्रा, शिशिर आचार्य, रोहन पटेल, हर्षद टकले आणि शैलेंद्र पाटसकर उपस्थित होते.

जामुंडा हिल्स हाफ मॅरेथॉन सपोर्टेड बाय : 
गिरीझ डेवलपमेंट कम्पनी
तेजस्वी ज्वेलर्स 
रेडिओ विश्वास ९०.८ एफ. एम.
गिरी मीडिया सर्व्हिसेस

क्रीडक स्पोर्ट्स 
डॉ पिंप्रीकर स्पोर्ट्स मेड रिहँब
फास्ट अँड अप
हॉटेल एमेराल्ड पार्क

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News