पुणे येथे राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन

Sep 14, 2022

जागतिका स्पर्धेत आणि आशियाई स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा सहभाग

ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि पुणे ब्रीज असोसिएशन, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक १४ ते १८ सप्टेंबेर, २०२२ दरम्यान पुणे येथे आंतर राज्य राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये टीम ऑफ फोर” आणि आय. एम. पी. पेअर” या  दोन प्रकारांचा समावेश आहे. टीम ऑफ फोर या प्रकारामध्ये विजयी होणाऱ्या संघाला भारताचे माजी खेळाडू आणि संघटक यांच्या नांवाचा  “स्व. कमलाकर राव “ चषक देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच आय. एम. पी. पेअर या प्रकारात विजयी जोडीला : सुभाष अग्रवाल ट्रॉफी”  देवून गौरवण्यात येणार आहे.  या स्पर्धेचे आयोजन पुणे येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे होणार आहे. ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या या स्पर्धेसाठी तयार केलेल्या नियमावली नुसार या स्पर्धेत भारतातील २३ राज्यांच्या संघानी आपला साहभाग नोंदवला आहे.  यामध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र,दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरयाणा, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब, गोवा, छत्तीसगड, केरळ, आसाम या राज्यांचा समावेश आहे. या सहभागी संघांची तीन गटात विभागणी करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या संघांचा पहिल्या आठ मध्ये समावेश आहे अश्या संघांची त्यांच्या गुणांनुसार या तीन गटात विभागणी करण्यात येणार आहे. तर इतर सर्व संघांची या तीन गटत विभागणी करण्यात येणार आहे.

पाहिले दोन दिवस या तीन गटामध्ये गटवार साखळी सामने होणार आहेत. त्यानंतर दिनांक १६ रोजी उपउपांत्य फेरीचे सामने तर दिनांक १७ रोजी उपांत्य सामने होतील. दिनांक १८ सप्टेंबर रोजी फायनल सामने खेळविले जातील.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News