ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीन पुणे येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे आयोजित राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या उपउपांत्य सामन्यात भारतीय रेल्वे, महाराष्ट्र- ब, दिल्ली- अ आणि तामिळनाडू- ब अय चार संघानी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारतीय रेल्वेच्या खेळाडूंनी बिहार विरुद्ध प्रथमपासूनच आघाडी घेत १२ राऊंडनंतर बिहारचा १८१ विरुद्ध ४१अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर महाराष्ट्र- बी संघाच्या जनक शहा, अनिल शहा, अनिल पाध्ये, सी. पी. देशपांडे एम. पी. आठवले आणि राजेश दलाल यांनी कर्नाटक- ब संघाविरुद्ध खेळतांना पहिल्या राऊंड पासून एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत चांगला खेळ करून ९१ विरुद्ध ६८अश्या २३ गुणांनी कर्नाटकचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दिल्ली- अ संघानेही एकतर्फी लढतीत ओरिसावर ११०विरुद्ध ६७ अशी मात केली.
मात्र गुजराथ विरुद्ध तामिळनाडू यांच्यामध्ये चुरस दिसून आली. साखळी सामन्यात चांगला खेळ करून प्रथम क्रमांकाने उपउपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या गुजराथ संघाला सरस गुणांकाच्या माध्यमातून उपउपांत्य फेरी गाठणाऱ्या तामिळनाडू- ब संघाने चांगलीच झुंज दिली आणि या उपउपांत्य फेरीच्या १२ राऊंडमध्ये चांगला खेळ करून गुजराथला ८३ विरुद्ध ६८ असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळविले.
या टीम चॅम्पिअनशिप बरोबर पेयर्स प्रकारच्या सामन्यांना सुरवात झाली मागील दोन दिवसामध्ये खेळल्या गेलेल्या टीम प्रकारामध्ये पहिल्या आठ संघामध्ये मध्ये निवड न होऊ शकलेले खेळाडू आणि काही नवीन खेळाडू अश्या ६८ पेयर्सनी ( जोडी) या प्रकारात सहभाग नोंदवला. यामध्ये आज खेळल्या गेलेल्या १८ बोर्ड नंतर एन. डी . तापरिया आणि रणजित रॉय या जोडीने ४९गुण मिळवत आघाडी घेतली आहे. त्याखालीखाल श शंभूनाथ घोष आणि जॉय नारायण रॉय ( ४७. गुण) आणि उमेश कुमार सिंग आणि आशिष विश्वकर्मा ( ४६.०० गुण ) यांनी चांगला खेळ करून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांकावर झेप घेतली आहे.
उद्या टीम प्रकारामध्ये उपांत्य सामने खेळविले जातील तर पेयर्स प्रकारामध्ये पुढील उर्वरित १८ बोर्डचे सामने खेळविले जातील.
नाशिकमध्ये राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन
लीग स्पर्धेमधून संघभावना जोपासण्यास मदत - रत्नाकर पटवर्धन, सचिव नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन...






