अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “बॅरिएट्रिक” शस्रक्रिया यशस्वी

Sep 17, 2022

डायबिटीस आणि ओबेसिटी यांचा संगम म्हणजे “डायबेसिटी” हि एक जागतिक गंभीर समस्या बनली आहे  बॅरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी  अशा काही रुग्णामध्ये अतिशय उपयुक्त ठरते

नाशिक  : जगभरातील काही देशांमध्ये लठ्ठपणा हि सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्या पाठोपाठ भारतात सुद्धा लठ्ठपणा झपाट्याने वाढतांना  दिसतो आहे , वर्ष  2030 पर्यंत 27% पेक्षा जास्त लोकसंख्या हि लठ्ठपणामुळे ग्रस्त होण्याची शक्यता  एका  अभ्यासात वर्तवण्यात आली आहे . लठ्ठपणा हा अनेक रोगांना आमंत्रण देखील देतो. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, ह्रदयाचे आजार, कर्करोग, मानसिक आजार, वंध्यत्व, संधिवात आणि झोपेत घोरणे असे विविध आजार  उध्दभवतात. वय , अनुवंशिकता ,बैठे जीवन , खाण्याच्या अयोग्य सवयी आणि काही मानसिक घटक लठ्ठपणाला कारणीभूत आहेत तरीही सगळ्यात जास्त महत्वाचा घटक आधुनिक जीवनपद्धती हाच आहे   वजन कमी करण्याकरिता योगा, जिम, डायट अशा अनेक गोष्टी करण्यात येतात.  मात्र तरी देखील लठ्ठपणा हि समस्या राहत असले तर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून लठ्ठपणावर “ बॅरियाट्रिक  सर्जरी ”वरदान ठरत आहे. या सर्जरी मुळे लठ्ठपणाच्या समस्यांबरोबरच त्यासोबत येणाऱ्या समस्या आणि आजार देखील आटोक्यात येतात , असे बॅरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जन डॉ. संदीप सबनीस यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , नाशिक येथे पारपडलेल्या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी असे प्रतिपादन केले.

श्रीमती उज्ज्वला जगताप वय ४४ वर्ष या एक व्यावसायिक आहेत त्या अंथरुणाला खिळलेल्या रूग्णांसाठी एक  केअर सेंटर चालवतात पत्रकार परिषेदमध्ये त्यांनी वजन कमी करण्याचा अनुभव सांगितला , त्यांनी  शस्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यात २२ किलो वजन कमी केले आणि आज  त्यांना खुप उत्साह जाणवत होता.  दैंनदिन काम करताना त्यांना पूर्वी अनेक समस्या जाणवत होत्या परंतु आता त्यांना दैनंदिन कामात कुठलाही अडथळा जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

श्री मयंक भंडारे यांचे वजन  वयाच्या २६ व्या वर्षी १५४ किलो होते,वाढत्या वजनामुळे झोपेत प्रचंड घोरणे आणि कामाच्या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास कमी होत होता. अति स्थूलते मुळे  चालतांना त्रास जाणवत होता.  यासोबत सामाजिक जीवनात अति लठ्ठपणा मुळे न्यूनगंड निर्माण झाला होता . यामुळे त्यांना निद्रानाश,आम्लपित्त अशा तक्रारीनांही सामोरे जावे लागत होते.  शस्रक्रिये नंतर मयंक यांनी महिन्याभरात १४ किलो वजन कमी केले , ते एक श्वान प्रेमी आहेत आणि लवकरच  हिमालयीन मोहिमेची योजना आखत आहे, जे त्याचं एक’दीर्घकाळच स्वप्न आहे.

श्री मोहम्मद गोलाम, हे एक व्यावसायिक आहेत आणि वाढत्या वजनाबरोबर अनेक आजारांनी ग्रस्त होते त्यांनी  डॉ.संदीप  सबनीस यांनी  त्यांच्या स्थूलते मुळे  हर्निया व बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया (स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी) सोबत हर्नियाच्या दुरुस्तीसाठी सल्लामसलत केली, आणि त्यांचे आयुष्य बदलले. त्यांना गंभीर स्लीप एपनियासह मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्याचा त्रास होता. त्यांना एकही पायऱ्या चढता येत नव्हती . शस्त्रक्रियेनंतर पंधरा दिवसांनी त्यांची मधुमेहाची औषधे बंद झाली आहेत, बीपीच्या गोळ्या कमी झाल्या आहेत आणि त्याचे वजन 12 किलो कमी झाले आहे आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय चढू शकतात.आणि दैनंदिन कामे सहज पणे करू शकतात

या पत्रकार परिषदेसाठी डॉ.संदीप सबनीस, डॉ. मनोज भंभारे, डॉ तुषार संकलेचा , डॉ. संदीप भंगाळे, डायबेटोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, डायटीशियन आणि फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश असलेली संपूर्ण बॅरिएट्रिक टीम उपस्थित होती.

“बॅरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी” साठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे , विशिष्ठ इन्फ्रास्टक्चर तसेच सर्जन सह इतर संपूर्ण टीम एकाच छताखाली उपलब्ध आहे. व त्यामुळे हे उपचार आपण मुंबई ,पुणे , इंदोर सारख्या महानगरापेक्षा  कमी खर्चात नाशिक मध्ये करू शकतो. या सोबतच लहान मुले व प्रौढांसाठी  उत्तर महाराष्ट्रातील पहिले “Obesity Clinic” ची सुरवात आम्ही लवकरच  करत आहोत. म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सर्वसमावेशक पर्याय म्हणून उत्तर महाराष्ट्रात  पुढे आले आहे.   —डॉ सुशील पारख – मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ,नाशिक 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News