पेयर्स मध्ये हेमंतकुमार शर्मा – मृदुल दास यांची आघाडी
दिनांक १७ सप्टेंबर : ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीन पुणे येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे आयोजित राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेच्या आजच्या चवथ्या
दिवशी उपांत्य सामन्याच्या पहिल्या तीन सत्रामध्ये भारतीय रेल्वे आणि दिल्ली -अ या संघानी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करून पहिल्यातीन राऊंडनंतर आघाडी मिळविली आहे.
या उपांत्य सामन्यामध्ये १२ बोर्डचे चार राऊंड्स खेळविले जात आहेत.
इंडियन रेल्वे विरुद्ध महाराष्ट्र – ब यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात तीन राऊंडमध्ये इंडियन रेल्वेकडून खेळतांना सुमित कुशारी, दि. मुजुमदार, जी. मन्ना, एस. दत्ता, पी. रॉय आणि एस कुशारी पहिल्या राऊंडपासूनच एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखून महाराष्ट्र- ब संघावर ८९ विरुद्ध ४९ अशी ४० गुणांची आघाडी आघाडी मिळविली आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्ली -अ संघाच्या खेळाडूंनीही आपल्या खेळामध्ये सातत्य राखत तामिळनाडू- ब संघाविरुद्ध ८४ : ४६ अशी तब्बल ३८ गुणांची आघाडी मिळविली आहे.
पेयर्स प्रकारामध्ये आज खेळल्या गेलेल्या तीन राऊंड नंतर हेमंतकुमार शर्मा – मृदुल दास यांनी चांगला खेळ करून १३४. ३८ गुण मिळवून आघाडी मिळविली आहे. तर बिनोद शॉ – संजीत डे, बिंदिया नायडू – प्रियरंजन सिन्हा या जोड्यांनी अनुक्रमे १०४. १३ आणि ९४. ३८ गुण मिळवून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर झेल घेतली आहे. त्याखालोखाल एस. के. शर्मा – पुनीत गांगल ( ८९. ०० गुण), अरीत्रा भट्टाचार्य – जॉयरूप मुलीक (८६. ५० गुण), अशा शर्मा – ये. मंडल ( ७०. १३ गुण), राजू तोलानी – अजय खरे (७०. १३ गुण) यांचाही खेळ चांगला होत असून पुढील राऊंड नंतर यामध्ये गुणानुक्रमे काही बदल होणे अपेक्षित आहे.
रेल्वे आणि दिल्ली -अ खेळाडूंची नांवे :-
इंडियन रेल्वे :- सुमित मुखर्जी, दि. मुजुमदार, जी. मन्ना, एस. दत्ता, डी. रॉय, एस. कुशारी.
दिल्ली- अ संघ : सुभाष गुप्ता, संदीप ठकराल, पूजा बात्रा, महेश बहुगुणा, राजेश्वर तिवारी.
दिनांक १९ ते २१ सप्टेंबर रोजी महिलांच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन : दिनांक १९ ते २१ सप्टेंबर, २०२२ पासून याच ठिकाणी पी. वाय. सी. जिमखाना. पुणे येथे महिलांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय पेयर्स ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५० ते ६० पेयर्सचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेत विजेत्यांना “काबरा ट्रॉफी” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.





