काबरा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला ब्रीज स्पर्धेला सुरवात

Sep 21, 2022

दिनांक १९ सप्टेंबर, पुणे : ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दिनांक १९ ते २१ सप्टेंबेर, २०२२ दरम्यान आयोजित केलेल्या काबरा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला ब्रीज स्पर्धेला पुणे येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

या स्पर्धेमध्ये “पेअर” या प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील २८ पेअर्सनी सहभाग नोंदवला आहे.

या स्पर्धेचे उदघाटन ब्रीचचे राष्ट्रीय खेळाडू तथा पुरस्कर्ते कमल काबरा, सोनल पाकूझा, महेश बहुगुणा आणि आनंद सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलतांना  कमल काबरा यांनी सांगितले की, केवळ महिलांसाठी अश्या प्रकारची वेगळी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्यामुळे महिलांना अधिक अधिक प्रोस्थाहंन मिळणार आहे. या स्पर्धांसाठी आणि इतर उपक्रमांसाठी आमच्याकडून कायमच सहकार्य केले जाईल असे सांगितले.

या २८  पेअर्समध्ये अठरा बोर्डचे चार राऊंड खेळविले जाणार आहेत. आज पार पडलेल्या तीन राऊंडमध्ये वासंती शहा आणि भारती डे या जोडीने सुंदर खेळ करून ४४. ७४ गुण मिळवून आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल रेचेल जोसेफ – शुभाश्री या जोडीने ४१. १३ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर तर मंजीत ओबेरॉय – अलका जैन या जोडीने ३७. ३९ गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेत विद्या पटेल आणि कल्पना या मध्य प्रदेशच्या २० आणि २१ वर्षीय खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्यांनीही चांगला खेळ करून तीन राऊंड नंतर ३४.५८ गूण मिळवत नववे स्थान मिळविले आहे.

या स्पर्धा तीन दिवस सुरु राहणार आहेत.  स्पर्धेत विजयी होणाऱ्या पेअर्सला भारताचे माजी खेळाडू आणि संघटक यांच्या नांवाचा “काबरा चषक ” देवून गौरवण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News