जुन्या पिढीने कष्ट केल्यामुळेच आजच्या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळत आहे – ऑलिंपियन कविता राऊत- तुंगार

Aug 29, 2019

ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त नाशिक मधील माजी खेळाडूं आणि जेष्ठ  क्रीडा संघटक यांचा गुणगौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न

नाशिक दिनांक २९ऑगस्ट :- भारताचे महान खेळाडू तथा  हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असणारे  मेजर ध्यानचंद याचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.  दर वर्षीप्रमाणे यावर्षीही कालिका  देवी मंदिर ट्रस्ट आणि  क्रीडा साधना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या सहकार्याने 
” २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ”  नाशिक मधील विविध खेळातील माजी राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा संघटक यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा गौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. 

नाशिकची सुवर्णकन्या ऑलीम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेती सावरपाडा एक्सप्रेस  कविता राऊत – तुंगार तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका देवी संस्थांनचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया.  क्रीडा संघटक अशोक दुधारे यांच्या हस्ते  १९६५- ७० पासूनच्या  विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळविणारे खेळाडू , क्रीडा संघटक, क्रीडा संस्था चालक आदींचा सन्मान करण्यात आला. 
या  सत्कारार्थी संघटकांमध्ये आर,आर. चव्हाण ,आबासाहेब घाडगे, मोहन चेगेडीया ,आर.के.पाटील, तसेच माजी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये कारभारी सांगळे, अॅड. गोखल बलकवडे,रविंद्र मोरे, उत्तम दळवी ( कुस्ती ), हेमंत पांडे , वर्षा रसाळ- पारोळसांडे, ( अॅथलेटीक्स),  युनुस जामदार, मधुकर देशपांडे, बाबा शेख, रामदास होते, विजय खरोटे, ( सर्व व्हॉलीबॉल), जया तांबोळी,  अरुण नागपुरे, स्वरांगी सहस्त्रबुद्धे, शुभांगी पंडित. ज्योती खात्री, अंजली पटवर्धन ( बास्केटबॉल), अशोक पवार , (फुटबॉल), संजय कुभोजकर, (टेबल टेनिस), रंगनाथ शिंदे , प्रशांत भाबड (कब्बडी),  रतन कुयटे (क्रिकेट) ,  कैलास लाव्हाड ( खो-खो),  अकिल अहमद शेख,  अनसर अहमद शेख,( हॉकी ) नारायण गायधनी ( ज्युदो),  अशोक कचरे (कॅरम), सयोगिता मारवाडी, अश्पाक शेख, (नेटबॉल), छाया नवले, राजेंद्र निगळ,  (फेन्सिंग), ओंकार वैरागकर, प्रवीण व्यवहारे (वेट लिफ्टीग) श्रीमती प्रणिता कुमावत,  कैलास लवांड, (खो.खो ), मंगल खापरे ,  मीना महाले, चंद्रकांत भाग्यवंत, (हॅन्डबॉल), मिलिंद नाठे,सुनिल खालकर, जयश्री गाजरे- पानगव्हाणे (आर्चरी), हेमंत पाटील, आणि  सोनाली आंबिलवाले ( चॉकबॉल) , शाम काठे, दिपक निकम, शरद नाठे, ( सायकल पोलो), प्रमोद अहिरे, (बॉल बॅडमिटिंन ),  श्रीमती कल्पना निरगुडे ,सलिम सैय्यद, अंजली खरोटे, (कार्फ बॉल), श्रीमती संगीता चाबुकस्वार (बॉल बॅडमिटिंन),  राहुल ठोळे, रामा पाटील, (सॉफ्टबॉल, बेसबॉल), सागर कारंडे, (थ्रोबॉल),  जगदीश गोल्डे,  (सेपकटकरॉ), यांचा समावेश होता. 
यावेळी बोलतांना कविता राऊत यांनी सांगितले की जुन्या खेळाडूंनी – संघटकांनी आणि संस्थांनी  खेळाच्या फारश्या सुविधा नसतांनाही ६० – ७० च्या दशकापासून  चांगली कामगिरी करून  क्रीडा क्षेत्रात नाशिकला वेगळी ओळख दिलेली आहे.  त्यांनी योग्य कार्य केल्यामुळे आमच्यासारख्या खेळाडूंना आणि आत्ताच्या नवीन खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे कालिका मंदिर आणि क्रीडा साधना संस्था आणि जिल्हा  क्रीडा अधिकारी यांनी या खेळाडू – संघटकाच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे ही फार अभिमानाची बाब आहे असे सांगितले आणि या सर्व पुरस्कारर्थीना धन्यवाद दिले. 
यावेळी रवींद्र नाईक आणि अण्णासाहेब पाटील यांनीही उपस्थितांना संभोदित केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक दुधारे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पुरस्कारार्थींच्या खेळातील प्रावीण्याची माहिती आनंद खरे यांनी दिली.  
या कार्यक्रमासाठी नाशिकच्या खेळाडूंनी उपस्थित देऊन क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या या दिग्गजाचा गौरवसोहळ्याला आणखी झळाळी दिली.  .   
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  नितीन हिंगमिरे, शशांक वझे, अजिंक्य दुधारे, भरत पाटील, मनीषा काठे आदीनी परिश्रम घेतले. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News