प्रिमियर लीग बास्केटबॉल स्पर्धा, नाशिक. एफ. एस. पॅंथर आणि अँपेक्स स्पार्टन्स अंतिम फेरीत

Oct 18, 2022

नाशिक  :- हिरवाडी बास्केटबॉल क्लब आणि अपेक्स बास्केटबॉल अकादमी (Apex Basketball Academy) यांच्या वतीने आणि नाशिक अमॅचूयर बास्केटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथील इंनडोअर हॉलमध्ये आयोजित पहिल्या नाशिक बास्केटबॉल प्रिमियर लीग स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पार पडलेल्या उपांत्य लढतीत एफ. एस. पँथर्स आणि अँपेक्स स्पार्टन्स यांनी विजय प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

एफ. एस. पँथर्स आणि आय. जी. किंग्स यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात एफ. एस. पँथर्सचे खेळाडू जयवीर, प्रशांत, अरुण, अश्रफ, आदेश प्रमोद, यांनी सामन्याच्या सुरवातीपासून एकमेकांमध्ये चांगला समन्वय ठेवून चांगला खेळ केला. त्यांनी पहिल्या सत्रात १६, दुसऱ्या सत्रात दोन, तिसऱ्या सत्रात १४ तर चवथ्या सत्रात १० गुण मिळवत हा सामना ४२-२७ असा १५ गुणांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. एफ. एस. पँथर्सच्या विजयात अक्षदने सर्वात जास्त २२ गुण मिळविले. तर देवांशने १८ गुण मिळवून त्याला चांगली साथ दिली. आय. जी. किंग्स कडून कर्णधार गजानन पाटीलने सर्वात जास्त १७ गुण मिळविले, तर सुरजने १५ गुण मिळविले परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात आर. के. जायंट्स आणि अँपेक्स स्पार्टन्स यांच्यामध्ये चांगलीच चुरस दिसून आली. पहिल्या सत्रात आर. के. जायंट्सच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून १८-१४ अशी चार गुणांची आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रात मात्र अँपेक्स स्पार्टन्सच्या अक्षद, यश, दिव्यांश, आदित्य, प्रथमेश यांनी चांगला खेळ करून १९ गुण मिळवून आपली पिछाडी भरून काढली, तर चांगल्या बचाव करतांना त्यांनी आर. के. जायंट्सच्या खेळाडूंना केवळ १३ गुण दिले. तिसऱ्या सत्रात आर. के. जायंट्सच्या रोहन, राकेश, रोशन, अमित, शुभम, राज, आणि प्रदीप यांनी चांगले पासेस देत १९ गुण वसूल केले, तर अँपेक्स स्पार्टन्सला केवळ १४ गुण मिळविता आले. चवथ्या सत्रात मात्र अँपेक्स स्पार्टन्सच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत तब्बल २४ गुणांची कमाई केली तर आर. के. जायंट्सच्या खेळाडूंना केवळ १० गुणांवर समाधान मानावे लागले. चवथ्या सत्रातील या उत्कृष्ट खेळांमुळे हा सामना अँपेक्स स्पार्टन्सने ७४-६० असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

उद्या दुपारी आर. के. जायंट्स आणि आय. जी. किंग्स यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी सामना खेळविला जाईल. त्यानंतर अँपेक्स स्पार्टन्स आणि एफ. एस. पँथर्स यांच्यात अंतिम सामना होईल.

या स्पर्धेमध्ये सचिन इटकर()बीड), जावेद शेख(धुळे), शाहीन शेख(जळगांव), जाकीर शेख, अंकुर गरुड, राहुल साळवे जुबेर शेख (सर्व नाशिक) हे पंच म्हणून आणि तांत्रिक जबाबदारी पार पाडत आहेत.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गजानन पाटील अक्षद क्षत्रिय, आनंद द्रविड, राजेश क्षत्रिय आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

आजच्या उपांत्य सामन्यांचे निकाल – १) एफ. एस. पॅथर विजयी विरुद्ध आय. जी. किंग्स (४२-२७)

२) अँपेक्स स्पार्टन विजयी विरुद्ध आर. के. जायंटस (७४-६०)

उद्या होणारे उपांत्य सामने –

तिसरा क्रमांक १) आर. के. जायंट्स विरुद्ध आय. जी. किंग्स अँपेक्स स्पार्टन

अंतिम सामना – २) अँपेक्स स्पार्टन विरुद्ध एफ. सी. पँथर्स

.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News