शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज

Nov 24, 2022

कृषीथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

नाशिक : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रकारची मदत करण्यात येत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही त्याकरिता समाजातील सर्व घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व उद्योग कृषीवर आधारित उद्योगांची माहिती देण्यात येत आहे ही अत्यंत कौतुकास्पद आणि स्वागतार्ह बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषिक्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचे ठक्कर डोम, एबीबी सर्कल जवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले असून या कृषीथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी भुसे बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, नाशिक अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाना पाटील, पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई आदी उपस्थित होते. तर व्यासपीठावर प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, मीडिया एक्झिबिटर्सचे संचालक नितीन मराठे, रश्मी हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी दादा भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान विकसित होत आहे, या तंत्रज्ञानाचा प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे, या प्रदर्शनात शेतकऱ्यांना परिसंवादाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून विविध प्रकारचे पुरस्कार देखील देण्यात येत आहेत. शेती क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून ड्रोनद्वारे फवारणी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ व इतर अपत्ती प्रसंगी उपग्रहाच्या माध्यमातून मदत देण्याची नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असून नुकसान भरपाई देखील या माध्यमातून देण्यात येणार आहे, असेही भुसे म्हणाले.
तसेच या प्रदर्शनात सहभागी झालेल्या कंपन्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रयोग यशस्वी करून दाखवावे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, इतकेच नव्हे तर या कृषी कंपन्यांनी गाव दत्तक घेऊन आपले प्रयोग यशस्वी करून दाखवले तर तो एक पथदर्शक आणि मार्गदर्शक प्रकल्प ठरेल असेही ते म्हणाले.
सध्या टोमॅटोला भाव नसून कांद्यालाही भाव नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहेत, प्रधानमंत्री पिक विमा योजनासाठी बीड मॉडेल राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती भुसे यांनी याप्रसंगी दिली. मात्र राज्यातील सर्वच शेतकरी कुटुंब वर्षभर राबवून सुद्धा पिकाला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व समाजाने उभे राहण्यासाठी बदलावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिथॉनची व्याप्ती वाढत असून देशातील एकूण कृषी प्रदर्शनापैकी तिसरे मोठे आणि राज्यातील दुसरे मोठे हे कृषीथॉन प्रदर्शन असल्याने आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय कसे वाढवावेत, कमी शेतीत जास्त उत्पादन कसे घ्यावे , यासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई यांनीही शेतकऱ्यांना बँके मार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक आयोजक साहिल न्याहारकर यांनी केले न्याहारकर म्हणाले की, गेल्या २४ वर्षांपासून कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून शेतकऱ्यांना नवनवीन कृषी संशोधनाची माहिती मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात सुमारे ३००पेक्षा जास्त स्टॉल असून ३०० पेक्षा जास्त कंपन्या यात सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांनी या प्रदर्शनासाठी नोंदणी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती देणे याकरिता परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विविध क्षेत्रातील कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आयोजक साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन मराठे यांनी मानले. कार्यक्रमास नाशिक शहरातील कृषी संबधित उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील विविध मान्यवर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News