ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

Feb 14, 2025

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन यांच्या सहकार्याने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व(सीएसआर) उपक्रमांतर्गत १० आदिवासी शाळांना ३० हून अधिक संगणक दान केले.
या संगणक वितरण समारंभाचे आयोजन बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ईएसडीएस डेटा सेंटर, नाशिक येथे करण्यात आले होते. या वेळी विविध मान्यवर आणि शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडचे मुख्य संचालन अधिकारी श्री. जितेंद्र पाठक, रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे अध्यक्ष अजय जाधव आणि इनर विल क्लबच्या अध्यक्षा माधुरी महाजन यांच्या हस्ते लाभार्थी शाळांना संगणक सुपूर्द करण्यात आले.
डिजिटल साक्षरतेद्वारे शिक्षणाला नवा आयामआजच्या तंत्रज्ञानयुगात डिजिटल साक्षरता अत्यंत गरजेची झाली आहे. मात्र, अनेक आदिवासी आणि ग्रामीण शाळांमध्ये संगणक शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ही गरज ओळखून ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
लाभार्थी शाळा आणि संगणक वाटप

खालील लाभार्थी शाळांना संगणक वाटप करण्यात आलेः

शाळेचे नाव : १) उन्नती प्राथमिक शाळा, नाशिक (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन देवनाथ पाटील ) संगणक संख्या 3,
2) जिल्हा परिषद शाळा, टाके घोटी (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन शिरीष भालेराव ) संगणक संख्या 3,
3) सर्वहारा परिवर्तन केंद्र, चिखलवाडी (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन आभास थोरात ) संगणक संख्या 3,
4) सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन डॉ. किरण बेरारी ) संगणक संख्या 3,
5) स्वामी विवेकानंद सोसायटी, मोरवाडी शाळा (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन जे. जे. पवार ) संगणक संख्या 3,
6) सेकंडरी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, एकलहरे (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन अजय जाधव ) संगणक संख्या 3,
7) जिल्हा परिषद शाळा क्र. १, दिंडोरी (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन गिरीश वाबळे ) संगणक संख्या 3,
8) डांग सेवा मंडळ (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन दीपक ढोलकिया ) संगणक संख्या 3,
9) जनता विद्यालय व उच्च माध्यमिक शाळा नानाशी (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन प्रतिभा चौधरी ) संगणक संख्या 3,
10) म्युनिसिपल शाळा क्र. ४६ (शिफारस करणारे सदस्य, रोटेरियन रोटेरियन चेतन भगत ) संगणक संख्या 3,

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड हे शिक्षण, पर्यावरण शाश्वतता आणि सामाजिक कल्याण यांसाठी सातत्याने योगदान देत आहे. या उपक्रमाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी मिळणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी नवे मार्ग खुले होणार आहेत.
या सहकार्याच्या माध्यमातून ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन हे वंचित समुदायांसाठी डिजिटल समावेशन आणि शैक्षणिक सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा करत आहेत.

 

 

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News