स्पर्धेत किसान तडवी, माणिक वाघ, प्रमोद कुमार, प्रवीण चौधरी,
नाशिक : नाशिक जिल्हा ऍथलेटिकस अँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आज रविवार दिनांक १८ डिसेम्बर, २०२२ रोजी आयोजित नाशिक जिल्हा विक्रांत हैप्पी होम क्रॉस कंट्री स्पर्धा आणि निवड चाचणीची यशस्वी सांगता झाली.
या स्पर्धेत पुरुषांमध्ये आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू किसान चौधरीने विजेतपद मिळविले. २० वर्षे मुलांमध्ये माणिक वाघ, १८ वर्षे मुलांमध्ये प्रमोद कुमार तर १६ वर्षे मुलांमध्ये प्रवीण चौधरीने विजेतपद मिळविले. महिलामध्ये राणी मुचंडी, २० वर्षे मुलींमध्ये कविता वाड, १८ वर्षे मुलींमध्ये वैशाली कातुरे आणि १६ वर्षे मुलींमध्ये नम्रता चौधरी यांनी विजेतपद मिळविले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी विक्रांत हैप्पी होम या उद्योग समूहाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या क्रॉस कंट्री स्पर्धेचा मार्ग गंगापूर रोड येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कुलपासून ते मखमलाबाद लिंक रोड, आणि परत असा होता. या स्पर्धाचे आयोजन ऑल इंडिया ऍथलेटिकस असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार करण्यात आले.
या स्पर्धेचे उदघाटन सकाळी ०६. वाजता विक्रांत हैप्पी होम उद्योग समूहाचे संचालक गंगाधर जाधव यांनी झेंडा दाखवून केले. यावेळी डॉ. मधुसूदन काळे, नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, संदीप फुगट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना गंगाधर जाधव यांनी सांगितले की नाशिकच्या खेळाडूनी मैदानी स्पर्धेत चांगली प्रगती केलेली आहे. या खेळाडूनी आणखी प्रगती करण्यासाठी आमच्याकडून सर्व सुविधा दिल्या जातील असे सांगितले.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या चार गटांच्या खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक परभणी येथे दिनांक २५ डिसेंबर, २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधेत्व करतील.
स्पर्धेचा निकाल
पुरुष – १० कि. मिटर १) किसन तडवी, २) दिनेश सिंघ, ३) रमेश गवळी.. २०वर्षे मुले – ०८ कि. मिटर –१) माणिक वाघ, २) शशीधर यादव, ३)संदीप चौधरी. १८ वर्षे ०६ कि. मिटर १) प्रमोद कुमार, २) देविदास गायकवाड, ३) रवींद्र चव्हाण १६ वर्षे – ०२ किलो मिटर १) प्रवीण चौधरी, २) वेदान्त चव्हाण, ३) देविदास बारे
महिला – १० कि.मिटर – १) राणी मुचंडी, २) उमा मानभावी,३) नेहा भुसारे. २० वर्षे मुली ०६ कि.मिटर – १) कविता वाड, २)शशी कसबे, ३)सुशीला चौधरी. १८ वर्षे मुली ०४ कि. मिटर – १) वैशाली कातुरे, २) रविना चौधरी, ३) रिकु चौधरी. १६ वर्षे मुली, ०२ कि. मिटर – १) नम्रता चौधरी, २) तेजस्विनी भोये, ३)वैशाली गायकवाड.






