नवनीत टॉपटेक राज्यातील १००० पेक्षा जास्त शाळांना डिजिटल शिक्षणाच्या सुविधा पुरवणार

Dec 19, 2022

नाशिक: शाळांना तंत्रज्ञान-एकीकृत शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध उदयोन्मुख शिक्षण तंत्रज्ञान कंपनी नवनीत टॉपटेकने २०२५ सालापर्यंत महाराष्ट्रातील १०००पेक्षा जास्त सीबीएसई शाळांसोबत भागीदारी करणार असल्याची घोषणा केली आहे. स्मार्ट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम टॉपस्कूल प्रदान करून या शाळांना सक्षम बनवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आधुनिक काळातील शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर साध्या-सहजसोप्या सुविधा पुरवण्यासाठी टॉपस्कूलची रचना करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुकूल असलेले टॉपस्कूल पहिली ते दहावीच्या इयत्तांसाठी उपलब्ध असून यामध्ये शाळेच्या शिक्षण व व्यवस्थापन संबंधी सर्व गरजा पूर्ण होतात. यामुळे शिक्षकांना शिकवण्याची प्रक्रिया अधिक जास्त सक्षम बनवता येते तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणातून अधिक प्रगत परिणाम मिळवता येतात. कन्टेन्ट तयार करून शेयर करण्यात, परीक्षा घेण्यात आणि डॅशबोर्ड व ऍनालिटिकल रिपोर्ट्समार्फत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यात टॉपस्कूल शिक्षकांना साहाय्य प्रदान करते.

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टॉपसर्कल कॉन्क्लेव्ह या शिक्षक सबलीकरण कार्यक्रमात नवनीत टॉपटेकचे सीईओ श्री. हर्षिल गाला यांनी सांगितले, “नवनीत टॉपटेकमध्ये आम्ही अशा सुविधा विकसित करतो ज्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि शिकण्याच्या अनुभवात सुधारणा घडवून आणतात. महाराष्ट्रातील २,००० पेक्षा जास्त शाळांसोबत सर्वाधिक विश्वसनीय ईलर्निंग सहयोगी म्हणून काम करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. २०२५ सालापर्यंत १,००० पेक्षा जास्त सीबीएसई शाळांसोबत भागीदारी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, यामध्ये नाशिक, इगतपुरी, सिन्नरमधील १००पेक्षा जास्त शाळांचा समावेश असेल. यामुळे १०,००० पेक्षा जास्त शिक्षक आणि १,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना टॉपस्कूलचे लाभ मिळतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा-आधारित विश्लेषणासाठी सर्व विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक हा सर्वसमावेशक, संपूर्ण बहुमितीय अहवाल असेल ज्यामध्ये संज्ञानात्मक, भावनिक आणि सायकोमोटर क्षेत्रांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती आणि अनोखी वैशिष्ट्ये यांची अतिशय तपशीलवार माहिती दिलेली असेल. पारंपरिक ग्रेडिंग पद्धतीच्या पलीकडे जाऊन टॉपस्कूल नव्या शैक्षणिक धोरणाला अनुकूल असे ३६० डिग्री प्रगतीपुस्तक देते ज्यामध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये व क्षमता यांचा समावेश केलेला असतो.”

त्यांनी पुढे सांगितले, “टॉपसर्कल कॉन्क्लेव्हमध्ये आम्ही मुख्याध्यापक, शिक्षक आणि प्रतिष्ठित पॅनेलिस्टना एकत्र आणले आणि इकोसिस्टमच्या महत्त्वाच्या आव्हानांवर अंतर्दृष्टी गोळा केले, पॅनल चर्चा, शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा आणि समुदाय विकास उपक्रमांच्या माध्यमातून लोकांसोबत जोडले जाऊन माहिती मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. सीबीएसई शिक्षकांसाठी भारतातील सर्वात मोठा समुदाय बनावे आणि भारतातील प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये अजून अशा ५० पेक्षा जास्त परिषदा आयोजित कराव्यात हे आमचे उद्दिष्ट आहे.”

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News