बचावात्मक आणि देखभालीच्या औषधांचा वापर करुन अस्थमांवर नियंत्रण शक्य : डॉ.दिनेश वाघ

Dec 20, 2022

नाशिक – साधारण पणे हिवाळा अस्थम्याच्या रुग्णांसाठी आव्हानात्मक काळ असतो. थंड वारे, कोरडी हवा यामुळे तुमच्या श्वसनमार्गावर परिणाम होतांना दिसतो. तर काही लोकांमध्ये घसा बसणे आणि वाहणारे नाक अशी लक्षणे सुध्दा अस्थम्याच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणांवर नियंत्रण मिळवणे आणि अशा स्थितीच्या रुग्णांचे व्यवस्थापन नाशिक येथील कन्सल्टंट इन क्रिटिकल केअर ॲन्ड चेस्ट मेडिसिन चे डॉ. दिनेश वाघ यांनी सांगितले “ ज्यावेळी थंडी वाढू लागते त्यावेळी वातावरणातील मोल्ड्स, दमटपणा आणि डस्टमाईट्स मध्ये वाढ होते, त्याच बरोबर छातीतील इन्फेक्शन्स आणि फ्लू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते . थंड हवे मुळे अधिक प्रमाणात अस्थमा वाढण्याची शक्यता असते, परिणामी खोकला (ओला किंवा सुका खोकला), छाती भरणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या गोष्टी घडत असतात. कधीकधी अशा प्रकारची लक्षणे वाढू लागली की सर्दी आणि फ्लू च्या व्हायरस मुळे न्युमोनिया ही होऊ शकतो . त्यामुळे आता हवामानामुळे निर्माण होणार्‍या अस्थम्याच्या नवीन केसेसही वाढू लागल्या आहेत, त्यामुळे असे दिसून येते की थंड हवेमुळे हिस्टामाईनची निर्मिती श्वासमार्गात होते. म्हणजेच ॲलर्जी झाल्यास हेच रसायन आपले शरीर तयार करत असते. या प्रक्रियेमुळे अस्थम्याची लक्षणे वाढून घरघर आवाज वाढू लागतो .”
“ एकीकडे लक्षणे आणि त्यांच्या तीव्रते कडे दुर्लक्ष न करणे जसे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्याच प्रमाणे लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घेणे हे श्वसनाशी संबंधित स्थिती मध्ये महत्त्वाचे असते. त्याच बरोबर अस्थमा आणि ट्रिगर्स यांमध्ये होणारा बदल सुध्दा डॉक्टरांना कळवणे आवश्यक असते जेणेकरुन डॉक्टर सर्वोत्कृष्ट उपलब्ध उपचार पध्दतीस सुचवू शकतील. अधिकतर केसेस मध्ये बचावात्मक आणि देखभालीच्या औषधांचा समावेश असतो. बचावात्मक औषधे ही गरजेनुसार दिली जातात ज्यामध्ये विशेषकरुन वेगाने परिणाम होऊन नावाप्रमाणेच वेगाने होणारा आजार कमी केला जाऊ शकेल. दुसरीकडे देखभालीची औषधे म्हणजे रोज औषधे देऊन अचानक उद्भवणारा त्रास कमी करण्यावर भर दिला जातो, म्हणूनच अस्थम्याच्या लोकांमध्ये ही उपचार पध्दती महत्त्वपूर्ण असते.” डॉ. वाघ यांनी पुढे सांगितले .
अस्थम्या मुळे फुप्फुसे ही प्रसरण पावतात आणि त्यांना सूज आलेली असते, अशा वेळी जर अगदी लहान प्रमाणात सुध्दा ॲलर्जी निर्माण करणारे घटक, व्हायरस आणि त्रासदायक घटक मिळाले तर ते अधिक घातक असते. म्हणूनच ज्यावेळी अस्थम्याचे रुग्ण हे जंतूंच्या संपर्कात येतात त्यावेळी श्वासमार्ग अधिक प्रमाणात सूजतो आणि अधिक प्रमाणात कफ निर्माण होऊन हवेच्या प्रवाहात वाढ न होता त्यात अडथळा ‍निर्माण होतो . म्हणूनच अस्थम्याच्या रुग्णांनी आधीच सतर्क राहून त्यांना त्रासदायक घटकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. या मध्ये डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणे, जर लक्षणांमध्ये काही बदल झाला तर त्यावर चर्चा करणे, डॉक्टरांनी जी नियमितपणे इनहेलेशन थेरपी दिली आहे ती सुरु ठेवणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
वरील उपचारां बरोबरच पीक फ्लो मीटर चा वापर करुन फुप्फुसांचे आरोग्य तपासून अधिक चांगल्या प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. पीक फ्लो मीटर म्हणजेच एक हातात धरून वापरता येणारे उपकरण असून यामध्ये किती जोरात कोणतीही व्यक्ती हवा त्यांच्या फुप्फुसातून फेकू शकते हे मोजता येते. यामुळे फुप्फुसाची शक्ती मोजता येते आणि श्वासमार्ग किती मोकळा आहे ते कळते. तुम्ही आत श्वास घ्यायाला जितका अधिक वेळ घ्याल तितकी तुमची स्थिती वाईट असते.

अधिकच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे-
दरवर्षी फ्लूची लस घेणे आणि नियमितपणे न्युमोनियाच्या बॅक्टेरियाची तपासणी करुन श्वसनमार्गातील इन्फेक्शन आणि न्युमोनियाचा धोका कमी करावा.
ज्यावेळी तापमान मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशा वेळी बाहेर जाणे टाळावे. उदा. रात्री ऊशीरा आणि पहाटे
तोंड आणि नाक झाकण्यासाठी स्कार्फ आणि मास्क वापरा- यामुळे होणार्‍या इन्फेक्शन पासून बचाव तर होतोच पण त्याचबरोबर नाकातोंडात थंड हवा शिरण्यापासूनही बचाव होतो.
धूळ आणि मोल्ड्स पासून बचाव करण्यासाठी जवळपासची हवा तसेच स्वत: स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा.
नियमितपणे हात धुवा आणि वेळोवेळी चेहेर्‍याला हात लावणे टाळा कारण फ्लूचे आणि अन्य जंतू हे हवेतून शरीरात प्रवेश करत असतात.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News